Thursday, July 23, 2009

माझं किचन : प्रिया बेर्डे


आत्म्याशिवाय शरीराची कल्पना करता येत नाही, तसे स्वयंपाकघराशिवाय पूर्णार्थाने घर असूच शकत नाही. म्हणून स्वयंपाकघर म्हणजे घराचा आत्मा, ही माझी पूर्वीपासूनच धारणा आहे. माझ्या स्वयंपाकघरात केवळ घरातील मंडळींपुरता स्वयंपाक कधीच होत नाही. स्वयंपाकाची आणि रसना तृप्त करण्याची हौस ही मला बालपणापासूनच; पण मला स्वयंपाकघरात ताबा मिळाला तो तारुण्यात. जबाबदारी अंगावर पडल्यामुळे.

आज मी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनवीत असले तरी मला पक्कं आठवतं, की माझी पहिली रेसिपी म्हणजे कांदेपोहे. ते मी नक्की कधी केले तेवढे आठवत नाही. आम्ही मूळचे कोल्हापूरचे. सण-सोहळे मोठ्या धुमधडाक्‍याने साजरं करणारं माझं माहेर. त्यामुळे नवरात्र, गणेशोत्सव असे सण घरी साजरे होत व तेवढ्याच जेवणावळीही उठत. अशा शुभप्रसंगी पुरणपोळ्या, तसेच उकडीच्या मोदकांपासून ते खिरीपर्यंत सारं गोडधोड घरीच केलेलं असायचं. नारळीभात, साखरभात, काजू-कतली यांच्यासोबत पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा हेही कोल्हापूरचं वैशिष्ट्य आमच्या स्वयंपाकघरात असायचं.

मी लक्ष्मीकांतशी लग्न केलं. माझं सासर म्हणजे संयुक्त कुटुंब. २०-२५ माणसं गणेशोत्सव काळात आमच्या घरी असतात. या घरात मला स्वयंपाक करण्याचा मनमुराद आनंद लुटता आला. माझ्या जाऊबाई- म्हणजे रवींद्र बेर्डे यांच्या पत्नी सुगरण. लक्ष्मीकांतची पहिली पत्नी रुही हिच्या हातालाही कमालीची चव होती. या घरात मी मांसाहार करायला शिकले. माझ्या नणंदेकडून मी भंडारी पद्धतीचं जेवण शिकले. मग तो साधा जवळा असो किंवा मसाल्याची सुरमई असो, कोंबडी असो वा मटण असो, बिर्याणी असो वा गोव्याची मच्छीकरी असो... मला सारे पदार्थ चांगल्या प्रकारे करता येतात, असा इतरांचा अभिप्राय आहे. मला केवळ मांसाहारच आवडतो असं नाही; शाकाहारही मला तितकाच प्रिय. अगदी पिठलं-भातही मला आवडतो. शेपू, कारली, दुधी भोपळा, कडधान्यं, बटाट्याची भाजी, पालेभाजी- सारं मला प्रिय.

लक्ष्मीकांत तसा खवय्या होता. चमचमीत आणि मसालेदार मांसाहार त्याला भारी प्रिय असे. असा कुणी खाणारा असला की साहजिकच तसे पदार्थ करायलाही मजा येते. लक्ष्मीकांतला माझ्या हातची बटाट्याची भाजीही खूप आवडायची. चित्रपट क्षेत्रातील कितीतरी माणसं लक्ष्मीकांतसह माझ्या घरी खास जेवायला यायची. अशोक सराफ, सचिन, विनय, जॉनी लिव्हर, डी. रामा नायडू, सतीश शहा, विजय कदम असे कितीतरी जण अजूनही जेवणावळींची आठवण काढतात.

"सम्राटासारखं भोजन असावं, कोणत्याही प्रकारच्या कटकटीशिवाय प्रसन्नतेने आणि अन्न हे पूर्णब्रह्म मानून मनसोक्त त्याचा आस्वाद घ्यावा,' ही माझी जेवणाविषयीची कल्पना. जेवण तयार करून ते वाढावं, हा स्वयंपाकाचा मूळ हेतू नाही. केलेल्या स्वयंपाकातील पदार्थांना ताटात जागच्या जागी स्थान देऊन, सजवून, चित्ताला प्रसन्नता येईल अशा प्रकारे ते वाढले जावेत आणि हे सारं करताना स्वच्छता पाळावी, हे मी माझ्या वडिलांकडून शिकले. पाटा-वरंवटा, परात ही पूर्वीची साधनंही घरात आहेत आणि वापरातही आहेत.

जेवणाचं हे महत्त्व मी माझ्या चित्रीकरणाच्या घाईगर्दीच्या वेळापत्रकातही जपते. कोणताही चित्रपट स्वीकारताना माझी पहिली अट असते ती साऱ्यांना चांगलं जेवण मिळालं पाहिजे. या साऱ्यांत कलाकार असतात तसे स्पॉटबॉयही असतात. त्यात अजादुजा भाव नाही. जेवण पंचतारांकित हवं, असा त्याचा अर्थ नसतो, तर जे असेल ते चांगलं असावं, एवढंच. आमच्या प्रॉडक्‍शनच्या वेळी मी स्वतः घरून जवळपास ४०-५० जणांचं जेवण घेऊन जात असे. अजूनही चित्रीकरणाला जाताना मी घरचाच डबा घेऊन जाते. घराबाहेरचं जेवण सहसा पोटात जात नाहीच. आताही जेव्हा माझी मुलं घरी येतात, तेव्हा मी दोन-तीन दिवस घरातच मुलांसोबत असते. त्या वेळी कोणत्याही कामापेक्षा मुलांचं सान्निध्य माझ्या लेखी महत्त्वाचं असतं. या दोन-तीन दिवसांत मी मुलांना जे जे काही खायचं असेल ते ते करून देते. त्या वेळी वरण-भातापासून ते चायनीजपर्यंत सारं काही माझ्या स्वयंपाकघरात शिजत असतं.

माझी आवडती बटाट्याची भाजी

नोकरीवर जाणाऱ्या गृहिणींना घाईघाईत आणि गडबडीत स्वयंपाक करून घड्याळाच्या काट्याबरहुकूम रेल्वे पकडणं शक्‍य नसतं. अशा वेळी पटकन होणारी, स्वादिष्ट व पौष्टिकही असणारी भाजी मी आज मैत्रिणींना सांगणार आहे. ही डिश मला खूप आवडते.

साहित्य ः उकडलेले चार-पाच बटाटे, चार कांदे, १५ ते २० लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, तीन-चार टोमॅटो, फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी, हळद, तिखट.

कृती ः हिंग, जिरे, मोहरी यांची तेलात फोडणी घालावी. यासाठी नेहमीपेक्षा जरा जास्त तेल वापरावं. लसूण आणि आल्याची पेस्ट करू नये, तर ते वाटून घ्यावेत. (म्हणजे हे पदार्थ दाताखाली यायला हवेत.) हे मिश्रण मिसळून त्यात त्यानंतर हळद टाकून त्यात कांदा परतून घ्यावा. हळद टाकल्यावर कांदा व्यवस्थित भाजला जातो. त्यानंतर चिरलेले टोमॅटो व तिखट टाकावं. भांड्यातील हे पदार्थ व्यवस्थित फिरवून घेतल्यावर त्यात बटाटे टाकावेत व पुन्हा परतून घ्यावेत. त्यानंतर झाकण टाकून पाचेक मिनिटं वाफेवर शिजवावेत. ही डिश एकदा तरी करून पाहाच.

प्रिया बेर्डे

सौज्यन्य : ई-सकाळ





Tuesday, July 21, 2009

स्वतःच स्वतःला चार्ज करू या


आपल्यातील सकारात्मकता वाढवण्यासाठी आपण नेहमी "वर्तमानात' जगण्याची आणि आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट "आज', नव्हे, "आत्ताच' करण्याची सवय लावून घ्यायला हवी. कामाच्या पद्धतीत सतत नावीन्य आणणे, त्यात बदल करत राहणे यातून आपण स्वतः मनाने ताजेतवाने राहण्यास मदत होते.

""सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते! तेच ते!'' विंदा करंदीकरांच्या एका प्रसिद्ध कवितेची सुरवात. नोकरी असो वा व्यवसाय- रोज उठून ऑफिसला जायचे, रोज तेच तेच काम करायचे, घरीही रुटीननुसार तेच काम करत राहायचे... खरंच कंटाळा येतो ना कधी कधी या सगळ्याचा? "मी का एवढी धावपळ करतोय/ करतेय?', "कशाला मी एवढा त्रास करून घ्यायचा?' असे प्रश्‍नही खूपदा आपणच आपल्या मनाशी विचारत असतो. खरे तर हा प्रश्‍न मनात डोकावू लागला की नक्की समजायचे, की आपली बॅटरी डाऊन झालीय. तिला चार्ज करायची नितांत गरज आहे. आपल्यापैकी काही जण म्हणतील, असा कंटाळा आला की आम्ही कामातून चार दिवस सुटी घेऊन कुठेतरी लांब फिरून येतो. पण नीट पाहिले तर सुटीवर जायच्या आधी रजा घ्यायची म्हणून काम संपविण्याची घाई, जेथे गेलेलो असतो तेथे वेगवेगळी ठिकाणे पाहणे, खरेदी करणे, प्रवासाची धावपळ व पुन्हा परत आल्यावर कामाचे साठलेले डोंगर वाट पाहत असतात. मजा करणे, आराम करणे हे सगळे या घाईगडबडीत राहूनच जाते. अर्थात प्रश्‍न तसाच आहे, की आपण आपली बॅटरी चार्ज कशी करायची? नेहमीच कार्यक्षम व उत्साही कसे राहायचे? त्यासाठी लक्षात घेऊ व चढू या या तीन पायऱ्या.

सर्वात पहिली पायरी म्हणजे कोणतेही काम करताना स्वतःच स्वतःला विचारायचे, की "आपण हे काम का करीत आहोत?'

हे काम खरेच आपल्याला आवडते, की केवळ पैसा व पदाचा विचार करून आपण करत आहोत, हे ठरवायला हवं. आपण करत असलेल्या कामातून आपल्याला आनंद व समाधान मिळत नसेल व केवळ गलेलठ्ठ पगारासाठी आपण काम करीत असू, तर बॅटरी सारखी सारखी डाऊन होणार हे नक्की! अर्थात नेहमी आपल्या आवडीची कामे आपल्याला करायला मिळतात, असे नाही. जी कामे आवडत नाहीत तीसुद्धा आपल्याला नाइलाजाने का होईना, पूर्ण करावी लागतात. तेव्हा कोणतेही काम असो, ते मी आनंदाने व पूर्ण क्षमतेने पार पाडणार, असा विश्‍वास आपण स्वतःला द्यायला शिकले पाहिजे. आजकाल सर्वत्र इन्स्टंटचा जमाना असल्यामुळे सगळे काही आपल्याला झटपट हवे असते. पण कामातील आनंद घ्यायचा असेल, आपली ऊर्जा टिकवायची असेल तर सोपा व तात्पुरता मार्ग उपयुक्त ठरत नाही. समजा आपल्या अंगणात खूप गवत वाढलेले आहे. ते गवत काढण्याचे दोन मार्ग आहेत- एक सोपा व दुसरा कठीण.

सोपा मार्ग म्हणजे गवत काढण्याचे यंत्र फिरवायचे. यामुळे काही दिवस अंगण अगदी स्वच्छ दिसते, पण लवकरच जोमाने गवत पुन्हा उगवते. दुसरा थोडा कठीण मार्ग म्हणजे खुरपे घेऊन, गुडघ्यावर बसून मुळापासून गवत उपटून काढायचे. हे करायला वेळ लागतो, थोडे कष्ट पडतात; पण गवत पुन्हा लवकर उगवत नाही. हा दुसरा मार्ग थोडा कष्टप्रद व अवघड असला तरी काम मुळापासून पूर्ण झाल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो व हा आनंद बऱ्याच काळापर्यंत टिकून राहतो.

स्वतःला चार्ज करण्यासाठीची दुसरी पायरी म्हणजे आपला सकारात्मक दृष्टिकोन तयार करणे, टिकविणे व वाढविणे. आपल्याला आयुष्यात जे मिळालेय त्याचा विचार आपण करायला हवा. त्यासाठी आपल्या रोजच्या जगण्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी वेळ काढायला हवा. बऱ्याच वेळा जे आपल्याकडे नाही त्या बाबतीत तक्रार करण्याच्या नादात जे आपल्याजवळ आहे, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्यातील सकारात्मकता वाढविण्यासाठी आपण नेहमी "वर्तमानात' जगण्याची व आपण करीत असलेली प्रत्येक गोष्ट "आज', नव्हे, "आत्ताच' करण्याची सवय लावून घ्यायला हवी. कारण काम करून होणाऱ्या श्रमांमुळे जेवढा थकवा येतो त्यापेक्षा जास्त थकवा काम टाळण्याच्या सवयीमुळे येतो. बऱ्याच वेळा एखादे काम पूर्ण झाले नाही किंवा अपयश आले की एखादी गळकी टाकी जशी हळूहळू रिकामी होते, तशीच आपली काम करण्याची ऊर्जा कमी होत जाते. अपयश म्हणजे काय, तर आपण करीत असलेल्या कामाचा अपेक्षित परिणाम न मिळणे. अपयश टाळण्यासाठी व यश मिळविण्यासाठी आपण जे मनात आणतो, त्यावर विश्‍वास ठेवला तर ते काम पूर्णपणे पार पाडू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. कारण कोणत्याही कामाचे यश हे आपल्या विचारात, कृतीत व वृत्तीत असते. आपल्याला चार्ज करण्यासाठीची तिसरी पायरी म्हणजे आपल्याला काम करण्याच्या पद्धतीत सतत नावीन्य आणणे.

काम करीत असताना त्यात काही चांगले बदल करत राहण्याची वृत्ती निर्माण करायला हवी, त्याबरोबरच आपल्या स्वतःच्या मनाला रोज निवांतपणे भेटले पाहिजे। तोचतोचपणा आपल्या कामाला आणि आयुष्याला साचलेपणा आणतो, त्यामुळे रोजच्या कामात नावीन्य आणण्याचा प्रयत्न आपणच करायला हवा. उदा.- ऑफिससाठी लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करून बघा; नेहमीच्या रस्त्याऐवजी एखाद्या दिवशी दुसऱ्या रस्त्याने ऑफिसला जा, इत्यादी. थोडे वेगळे जगून बघितल्याने आपल्या कामाला प्रवाहीपणा येतो. कामाचा सुंदर प्रवाह आपल्यातील उत्साह वाढवितो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणतेही काम करताना कुठे आणि केव्हा थांबायचे, हे आपल्याला अचूक माहिती असेल तर आपण नेहमीच चार्ज्ड राहतो. चला तर मग! काम करण्याची ऊर्जा वाढविणे आणि टिकविणे यासाठी आपला योग्य व समतोल आहार, व्यायाम व विश्रांती यांची तजवीज करू या व ही ऊर्जा वापरायची पुरेपूर स्पष्टतासुद्धा आपल्यामध्ये वाढवू या.

सौज्यन्य :ई-सकाळ

आयुष्यावर बोलू काही


वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, विरंगुळा आणि काम यात समतोल हवा. मनाचा आनंद हेच तर आयुष्याचं सार आहे. त्यानंच आयुष्याला अर्थ येतो. मानव जातीच्या जगण्याचा खरा उद्देश आनंद मिळवणं हाच आहे, म्हणूनच आयुष्याची गती जरा कमी करून थोडं शांत बसा. आपल्याला मनापासून काय आवडतं त्याचा शोध घ्या आणि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीच करा.

आपणा सर्वांना एका हावरट आणि श्रीमंत शेतकऱ्याची गोष्ट माहिती आहे ती अशी - या शेतकऱ्याला राजाकडून असं एक वचन मिळालं, की तो एका दिवसात जेवढं अंतर चालेल तेवढी जमीन त्याला बक्षीस दिली जाईल. त्यासाठी अट अशी होती, की चालायला तो जिथून सुरवात करेल त्या ठिकाणी त्यानं सूर्यास्तापर्यंत पोचायला हवं. दुसऱ्या दिवशी सकाळी या श्रीमंत शेतकऱ्यानं वेगानं चालायला सुरवात केली; कारण त्याला जास्तीत जास्त जमीन मिळवायची होती. दुपारी तो बराच दमला होता, तरी चालतच राहिला; कारण भरपूर श्रीमंत व्हायची आयुष्यातली ही अपूर्व संधी त्याला गमवायची नव्हती.

दुपार सरल्यावर राजानं घातलेली अट एकदम त्याच्या लक्षात आली. जिथून सुरवात केली तिथं त्याला सूर्यास्तापूर्वी परत पोचायचं होतं. जास्तीत जास्त जमीन मिळवायच्या लोभामुळे तो आता खूप दूर आला होता. त्यानं परतीचा प्रवास सुरू केला. त्याचं लक्ष सूर्यास्ताकडे होतं.

सूर्यास्त जवळ येऊ लागला तसा तो अधिक वेगानं परतू लागला. आपण अकारण फार दूर चाललो हे त्याच्या लक्षात आलं, वेग अधिक वाढवणं प्राप्तच होतं. तो पूर्णपणे थकला होता. त्याला श्‍वासही घेणं खूप अवघड जात होतं, तरीही सर्व शक्ती पणाला लावून तो पळतच होता आणि अतिशय कष्टानं तो कसाबसा सकाळी निघालेल्या जागी येऊनही पोचला; परंतु अति श्रमामुळे तो धाडकन जमिनीवर कोसळला. तो काही परत उठू शकला नाही. तो सूर्यास्तापूर्वी मूळ जागेवर तर पोचला त्यामुळे राजानं सर्व जमीन त्याला दिलीही; पण त्याला मृत्यूला कवटाळावं लागलं. शेवटी त्याला तेथेच पुरण्यात आलं. त्यासाठी त्याला फक्त साडेतीन हातांची जागा पुरली.

या गोष्टीत एक मोठं सत्य दडलेलं आहे. तो शेतकरी श्रीमंत होता की नाही हे महत्त्वाचं नाही. अति हव्यासानं, लोभामुळे भारलेल्या कोणत्याही माणसाचा शेवट हा याच पद्धतीनं होतो हे मात्र विदारक सत्य आहे.

ही गोष्ट म्हणजेच आपल्या आजच्या जीवनाचं प्रवासवर्णनच नाही का? मती गुंग करणारी गती आपल्या आयुष्याला आली आहे. प्रत्येक जण वेगानं, अधिक वेगानं नुसता धावतो आहे.

आपण दिवसामागून दिवस पैसा, अधिकार आणि मान्यता मिळविण्यासाठी जिवाच्या आकांतानं धावतच राहतो ना? असं करीत असताना आपण आपले आरोग्य, स्वास्थ, कुटुंब, आपले छंद, आतला आवाज आणि आपल्या सभोवतालच्या अनेक सुंदर-सुंदर गोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असतो. प्रथम संपत्ती, अधिकार आणि आणि मान्यता मिळविण्यासाठी आपण आपलं आरोग्य खर्चून बसतो आणि नंतर आरोग्य परत मिळविण्यासाठी आपल्याला मिळवलेली सर्व संपत्ती खर्चावी लागते. मग एक दिवस आपल्या लक्षात येतं की हे सर्व मी का केलं?

खरंच पैशाची आपल्याला किती गरज असते? पण, हे लक्षात येतं तेव्हा मात्र आपण काळ मागं नेऊ शकत नाही आणि गमावलेल्या गोष्टीही आपण परत मिळवू शकत नाही. समोर असलेली शिडी तर आपण दमछाक करून बरीच वरती चढून आलेलो असतो; परंतु वर आल्यावर आपल्या लक्षात येतं, की ही शिडीच आपण चुकीच्या भिंतीवर लावलेली असते. आयुष्य म्हणजे नुसता पैसा, नुसती सत्ता, नुसता अधिकार मिळवणं नाही! आयुष्य म्हणजे नुसते काबाडकष्ट करणंही नाही. आयुष्य जगण्यासाठी पैसा गरजेचा आहे हे खरं; पण किती? पैसा साधन आहे; परंतु साध्य मात्र नक्कीच नाही.

वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, विरंगुळा आणि काम यात समतोल हवा. आपल्या आयुष्यात हा समतोल कसा आणायचा हे आपल्यालाच ठरवावं लागतं. आपला प्राधान्यक्रम ठरवा. आयुष्य ही एक तडजोड आहे हे लक्षात ठेवा; पण असे निर्णय घेताना आपलं अंतर्मन काय सांगतं याकडे लक्ष द्या. त्याच्याकडे काणाडोळा तर नक्कीच व्हायला नको. मनाचा आनंद हेच तर आयुष्याचं सार आहे. त्यानंच आयुष्याला अर्थ येतो. मानव जातीच्या जगण्याचा खरा उद्देश आनंद मिळवणं हाच आहे, म्हणूनच आयुष्याची गती जरा कमी करून थोडं शांत बसा. आपल्याला मनापासून काय आवडतं त्याचा शोध घ्या आणि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीच करा. काम करताना निसर्गाचा आनंदही मनमुराद लुटा. अवतीभोवतीच्या मंडळीच्या भाव, भावनाही जोपासा. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. ते छोटं आहे, थोरही आहे. आयुष्य गृहीत धरता येत नाही. आयुष्यातील समतोल साधा आणि उशीर होण्यापूर्वीच आयुष्य पूर्ण अर्थानं जगा!

सौजन्य: ई-सकाळ




Friday, July 17, 2009

माझं किचन - डॉ. निशिगंधा वाड


तसे पाहिले तर माझे लग्न होईपर्यंत माहेरी माझ्या वाटेला स्वयंपाकघरातील कोणतेही कामच येत नसे. कुटुंबात स्वयंपाकघरात काम करणाऱ्या अनेक व्यक्ती होत्या. त्यात मी घरात शेंडेफळ असल्यामुळे लाडाकोडात वाढलेली; पण काम अंगावर पडल्यावर शिकावेच लागते. तोच अनुभव माझाही.
लग्नानंतर वेगळा संसार थाटल्यावर प्रत्येकीला स्वयंपाकात स्वयंसिद्ध व्हावे लागते, त्याच प्रक्रियेतून मी गेले. मला तशी स्वयंपाक करायची आवड नव्हती; पण गरजेपोटी सर्वकाही करावे लागते. अर्थात गरजेपोटी करायचे असले, तरी ते केवळ करायचे म्हणून करायचे नाही, हे माझे तत्त्व. तीच शिस्त माझ्या स्वयंपाकात आणि स्वयंपाकघरात आहे. कुटुंबीयांना चारी ठाव चांगले करून देणे, अन्न मोजकेच असले तरी ते पौष्टिक असावे, त्यातील सकसता कशी वाढवता येईल याला प्राधान्य द्यावे, अशाच मताची मी आहे. म्हणून स्वयंपाकघरातील स्वच्छता आणि अन्नाची सकसता यांना मी नेहमीच अधिक महत्त्व देत आले आहे.

पाककृती आणि पाककला या दोन भिन्न बाबी आहेत. पाककृती या प्रयत्नांनी जमू शकतात; पण पाककलेसाठी जी रसिकउडी घ्यावी लागते, ती प्रत्येकाला जमतेच असे नाही. पाककला हीदेखील इतर कलांसारखीच एक कला आहे. मी जेव्हा स्वयंपाक करायला शिकले, तेव्हा ते कुणा एकाकडूनच शिकले असे नाही, व्यक्ती, अनुभव, गरज, पुस्तके आणि नियतकालिके, दूरचित्रवाणी अशा विविध माध्यमांतून मी शिकत गेले. काही गोष्टी आजीच्या पाहून शिकले, तर लग्न झाल्यावर चिकनचे पदार्थ नवऱ्याकडूनही शिकले. स्वयंसिद्ध होणे महत्त्वाचे आहे. मग ती स्वयंसिद्धता आपल्या स्वयंपाकघरात का नसावी? मॉड्युलर किचन घेणे आता अनेकांना परवडण्यासारखे असते. मायक्रोवेव्ह अनेकांच्या घरात असतो. आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा पूर्णतः विसर पडला आहे, असे मलातरी वाटत नाही आणि जाणवत नाही. म्हणून ज्या अन्नावर आपले पालनपोषण होते, ते अन्न अधिकाधिक चांगल्या तऱ्हेने कसे सिद्ध करता येईल, यासाठी प्रत्येक गृहिणीने दक्ष राहिले पाहिजे. ही दक्षता मी घेत असते. म्हणून माझ्या घरी स्वयंपाक करण्यासाठी इतर व्यक्ती असल्या तरी माझ्या स्वयंपाकघरावर अधिराज्य माझेच असते. स्वयंपाकघरात काय हवे, किती हवे, कसे हवे, कधी हवे, याचा निर्णय मीच घेते.
स्वयंपाकघर हे माझ्यासाठी दुसरे देवघरच असते; नव्हे, माझे देवघरच स्वयंपाकघरात आहे. त्यामुळे तेथला नीटनेटकेपणा आणि स्वच्छता याला मी प्राधान्य देत आले आहे. देवाची भक्ती जशी मनाची मशागत करते, तशी शरीराची मशागत अन्नातून होत असते. हे अन्न थेट पोटात जात असते. त्यामुळे त्याच्या बाबतीत कटाक्ष हा असलाच पाहिजे. माझ्या मुलीला जंक फूडची मी कधीच सवय लावली नाही. आता तिलाच असे बाहेरचे खाद्यपदार्थ आवडत नाहीत. माझ्या सुदैवाने मला योग्य वेळी आहारासंबंधीची खूप चांगली चांगली पुस्तके वाचायला मिळाली. गर्भावस्थेपासून वयात येईपर्यंत कोणते अन्नघटक परिपूर्ण वाढीसाठी आवश्‍यक आहेत, याचे चांगले ज्ञान मला या पुस्तकांतून मिळाले. त्याचाही मी परिपूर्ण वापर माझ्या स्वयंपाकघरात करते.

जाता जाता मला एक सुचवावेसे वाटते- सध्या महिला कर्ती झालेली आहे. शिकलेली आहे. स्वतः काहीतरी वेगळे करावे, अशी युयुत्सु वृत्ती तिच्यात आहे. स्त्रीने प्रयत्नवादी असावेच; पण प्रयोगशीलही असावे. ही प्रयोगशीलता स्वयंपाकघरात दिसून यावी. स्वयंपाक हे केवळ मुलींचे वा स्त्रियांचेच क्षेत्र आहे, असे आता पूर्णत्वाने म्हणता येणार नाही. मुली अभ्यासात आणि करिअरमध्ये क्रांती करीत आहेत. म्हणून घरातील मुलांनाही स्वयंपाकघरातील मदतीचे शिक्षण द्यावे. त्यांनाही स्वयंसिद्ध करावे. यात कमीपणा नसून समंजसपणा आहे, हेही त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे.

माझी आवडती डिश - मिक्‍स व्हेजिटेबल पराठा

साहित्य - एक कप गव्हाचे पीठ, एक कप बेसन, पाव कप ज्वारीचे पीठ, पाव कप तांदळाचे पीठ, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, दोन चमचे तेल, एक उकडलेला बटाटा, एक गाजर किसलेले, अर्धी जुडी पालक (वाटून घेतलेली), लसणाच्या दोन पाकळ्या, एक चमचा ओवा, एक चमचा साखर, दोन चमचे लोणी, दोन चमचे लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ.

कृती - वरील सर्व पदार्थ पिठात नीट कालवून मळून घ्यावे आणि पराठे लाटून तव्यावर दोन्ही बाजूला कमीत कमी तेल लावून शक्‍यतो वाफेवर शेकावे.

या पराठ्यात बहुतेक सर्व पदार्थांचा समावेश आहे. त्यात पौष्टिक घटकही पुरेपूर आहेत. शिवाय, मुलांना शाळेत टिफीनमध्ये देता येण्यासारखेही आहे. गृहिणींना ही डिश जरूर करावी. स्वतः चाखावी व मुलांनाही याची गोडी लावावी.
डॉ. निशिगंधा वाड

सौजन्य : ई-सकाळ

Sunday, July 5, 2009

Marathi Quotes




Friendship/Marathi












Friendship/Marathi










Friendship/Marathi









Friendship/Marathi









Friendship/Marathi










Friendship/Marathi









Friendship/Marathi









Friendship/Marathi







Friendship/Marathi











Friendship/Marathi











Friendship/Marathi










Friendship/Marathi








Friendship/Marathi









Friendship/Marathi








Friendship/Marathi










Friendship/Marathi








Friendship/Marathi









Friendship/Marathi



Funny Poem

१)

मुसळधार पाऊस......
ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा...
बघ माझी आठवण येते का..
हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड.
इवलासा मेल वाचून बघ...
बघ माझी आठवण येते का????

वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव.
डोळे मिटुन घे.तल्लीन हो.
नाहीच आठवल काही तर मेल चेक कर.
इनबॉक्स वर ये.तो भरलेला असेलच.
मग वाचू लाग.
माझे कंटाळवाणे फ़ॉरवर्ड वाचुन घे.
वाचत राहा मेल संपेपर्यंत.
तो संपनार नाहीच.
शेवटी मेल बंद कर.डिलीट करु नकोस.
फ़ॉरवर्ड करु नकोस.
पुन्हा त्याच इनबॉक्स वर ये.
आता दुसऱ्या मेलची वाट बघ.
बघ माझी आठवण येते का???.

घड्याळात पाच वाजतील.
तुला निघायची घाई असेल.
तितक्यात एक मेल येईल.
तू तो इच्छा नसतानाही उघडून बघ.
तो विचारील तुला मेल न करण्याचे कारण.
तु म्हण सर्व्हर डाऊन होता.
मग थोडे मेल फ़ॉरवर्ड कर..तुही वाच.
तो पुन्हा फॉरवर्ड करेल.
तू तो डीलीट कर.
एखादी कविता वाच.
बघ माझी आठवण येते का???

मग निघायची वेळ होईल.
तरी पुन्हा मेल येईल.
तो म्हणेल काळजी घे स्व:ताची..,
मग तुही तसेच लिही.
मेल मागून मेल येतील.
फॉरवर्ड मागुन फॉरवर्ड होतील.
शेवटी सगळे डीलीट कर.
आता रिकाम्या इनबॉक्स कड बघ?
बाघ माझी आठवण येते का ??





2)

सॉफ्टवेर गारवा :

काम जरा जास्त आहे, दर रिलीज़ ला वाटत ...
काम जरा जास्त आहे, दर रिलीज़ ला वाटत ...
भर दुपारी रिवीव् (review) होउन "डिजाईन " मनात साठत... !
तरी बोटे चालत रहातात .
डोके मात्र चालत नाही ...
बग ट्रैक मधे मेजोर Defects शिवाय काहीच दिसत नाही ..!!
तितक्यात कुठून एक मेल Inbox मधे येतो ...
तितक्यात कुठून एक मेल Inbox मधे येतो ...
रिलीज़ डेट दोन दिवसांनी Postpone करून जातो .. !!!
माउस उनाड मुला सारखा सैरावैरा पळत राहतो ...
CC, Forwards, Songs आणि Winamp मधे जाऊ पाहतो ..!!!!
कोडिंग संपून टेस्टिंग चा सुरु होतो पुन्हा खेल …
कोडिंग संपून टेस्टिंग चा सुरु होतो पुन्हा खेल …
डॉक्युमेंटेशन संपता संपता येउन ठेपते रिलीज़ ची वेळ .. !!!!
चक्क डोळ्यांसमोर सगला कोड अचानक चालू लागतो ....……………..
UAT मधे तरीही कुठून Defect येतो ....!!..!


३)

अभी अभी तो प्यार का PC किया
है चालुअपने दिल के Hard Disk पे और कितनी Files डालू
अपने चेहरे से रूसवाई की Error तो हटाओऐ जानेमन
अपने दिल का Password तो बताओवो तो
हम है जो आप की चाहत दिल मॆं रखते हैवरना
आप जैसे कितने Softwares तो बाज़ार में बिकते हैरोज़
रात आप मेरे सपने में आते हो
मेरे प्यार को Mouse बना के उंगलियों पे नचाते हो
तेरे प्यार का Email मेरे दिल को लुभाता है
पर बीच में तेरे बाप का Virus आ जाता है
और करवाओगे हमसे कितना इंतजार
हमारे दिल की साईट पे कभी Enter तो मारो यारा
आपके कई नखरे अपने दिल पे बैंग हो गयेदो
PC जुड़ते जुड़ते Hang हो गएआप
जैसो के लिये दिल को Cut किया करते है
वरना बाकी केसेस में तो Copy Paste किया करते है
आप हँसना आप क चलना आप की वो स्टाईल
आपकी अदाओं की हमने Save कर ली है
Fileजो सदीयों से होता आया है
वो रीपीट कर दुंगातु ना मिली तो तुझे Ctrl+Alt+Delete कर दुंगालड़कीयां
सुन्दर हैं और लोनली हैंप्रोब्लम है कि बस वो Read Only हैं


) मला तुझी आठवन येते

आकाश काले झाले की ,
मला तुझी आठवण येते ।

ढग दाटून आले की ,
मला तुझी आठवण येते ।

जोरात पावूस आला की ,
मला तुझी आठवण येते ।

चिम्ब चिम्ब भिजल्यावर ,
मला तुझी आठवण येते ।





माझी छत्री मला परत कर ....!






Wednesday, July 1, 2009

माझं किचन: मंजूषा दातार-गोडसे


असंभव' आणि "राजा की आयेगी बारात' अशा मालिकांमधून सध्या घराघरात पोचलेल्या मंजूषा दातार-गोडसे स्वयंपाकही उत्तम करतात. किचनमध्ये स्वच्छता हवी आणि सगळ्या गोष्टींची आधी तयारी करून मग पटापट स्वयंपाक उरकायचा, कोणताही स्वयंपाक दीड तासात उरकतो, असं त्या सांगतात. त्यांचं हे स्वयंपाकाविषयीचं आणि किचनविषयीचं मनोगत.

लग्नाआधी मी घरात सर्वांत लहान असल्यानं स्वयंपाक करायची कधी वेळच आली नाही. आई कधी सांगायची नाही आणि ती नसेल, तेव्हा मोठी बहीण असायची. त्यांना कांदा चिरून दे, इतर काही कामं कर अशी लुडबूड करायचे; पण मोठी जबाबदारी कधी पडली नाही. लग्नानंतर मात्र मला बरंच टेन्शन आलं होतं. एक तर सासरी एकत्र कुटुंब होतं. त्यात मी माहेरची दातार आणि नंतर गोडसे. त्यामुळे कोकणस्थ आणि देशस्थ असा फरकही होता. पण अगदी पहिल्या दिवसापासून सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं.

एक तर माझ्याकडे तीन रेसिपी बुक्‍स होती. माझी आई, ताई आणि तिसऱ्या स्वतः सासूबाई. त्यामुळे काही अडलं, की पटकन्‌ त्यांना विचारायचं आणि करून टाकायचं, असं सरळसोपं गणित होतं. शिवाय घरातले सगळेच खूप चांगल्या स्वभावाचे. कुणाचं पदार्थाला नावं ठेवणं नाही, की नखरे नाहीत. शिवाय दाद देण्याची पद्धत. मला आठवतं, की पहिल्यांदा केलेल्या पोळ्यांचंदेखील सगळ्यांनी खूप कौतुक केलं होतं. "किती छान झाल्यात, मऊ झाल्यात,' असं सगळ्यांनी म्हटलं होतं. खरं तर पोळ्यांसारख्या पोळ्या; पण त्यांच्याबद्दलही दाद मिळाली. अशा वातावरणामुळे मग आणखी हुरूप येतो.

आमच्या घरात गौरी-गणपती, नवरात्र, दिवाळी सगळं एकत्र असतं. त्यामुळे त्या दिवसांमध्ये मी शूटिंग किंवा नाटकाचे प्रयोग यांच्यामधून आवर्जून वेळ मोकळा ठेवते. या दिवसांत नैवेद्य, मोदक असा सगळा साग्रसंगीत स्वयंपाक असतो. तोही मी करते. बऱ्याचदा मुंबईला सलग दहा-बारा दिवस शूटिंग असतं. त्यामुळे तिथंही छोटं किचन आहे. मात्र, तिथं स्वयंपाकाला वेळ खूप कमी मिळत असल्यानं तिथं सगळा इन्स्टंट मामला असतो. खाण्याचा, करून घालण्याचा खरा आनंद अर्थातच पुण्यातच मिळतो. माझा पती अभय खूप चांगला स्वयंपाक करतो. मी नसताना मुलाला- रुद्रला डबाही बऱ्याचदा तोच करून देतो. त्यामुळे मी पुण्यात असते, तेव्हा त्यांना चांगलंचुंगलं करून खायला घालावं, त्यांना काही करायला लागू नये, हे मी आवर्जून बघते. रुद्र शाळेला सव्वासहाला जातो, अभयही ऑफिसला लवकर जातो. त्यामुळे पुण्यात साडेपाचलाच स्वयंपाक सुरू होतो. रुद्र दहा वर्षांचा आहे. तो आणि त्याचे बाबा यांचं खूप छान ट्यूनिंग आहे आणि दोघंही कधी अन्नाला नावं ठेवत नाहीत. कधी मीठ कमी-जास्त पडलं, तर बोलतसुद्धा नाहीत. सासूबाईही खूप छान स्वयंपाक करतात; पण त्याही प्रत्येक पदार्थाला दाद देतात.

स्वयंपाक करत असताना किचन स्वच्छ असलं पाहिजे, असा माझा कटाक्ष असतो. पुण्यात आले, की मी पहिल्यांदा अर्धा तास सगळं जागच्या जागी लावून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते. किचन स्वच्छ असलं, की तुमचं मनही प्रसन्न होतं आणि त्यामुळे कामंही खूप लवकर आणि उत्साहानं उरकली जातात, असं मला वाटतं. माझा कुठलाही स्वयंपाक- अगदी पुरणाचा स्वयंपाकही दीड तासात उरकतो. "हिचं कधी होतं कळतही नाही,' असं सासूबाई म्हणतात. मला खूप वेळ किचनमध्ये घालवायला आवडत नाही. मात्र, तिथं जेवढा वेळ असते, तो योग्य रीतीनं, मनापासून वापरते. बाकी गोष्टींत जसं कॉन्संट्रेशन लागतं, तसं किचनमध्येही गरजेचं असतं. स्वयंपाक करताना कणीक भिजवून ठेवायची, भाज्या चिरायच्या, अशी सगळी तयारी आधी करून घेते. एक तर कणीक मुरल्यामुळे पोळ्या चांगल्या होतात आणि सगळी सिद्धता आधी झाल्यामुळे मग प्रत्यक्ष पदार्थ पटापट उरकतात. तुम्ही आता कुकर लावू, मग पोळ्या करू असं काम रेंगाळत ठेवलंत, की मग गोंधळ उडतो. बहुतेक वेळा सकाळी सातपर्यंत माझा स्वयंपाक उरकलेला असतो. बाई मदतीला असतील, तर काम आणखी पटापट होतं.

वेळ मिळेल, तेव्हा टीव्हीवरचे रेसिपी शोज मी बघते आणि जमेल तेव्हा करूनही बघते. अर्थात ठरवून वेगळेपणानं काही करत नाही, कारण आपल्याकडे मुळातच इतके वैविध्यपूर्ण पदार्थ आहेत, की ते करून बघणं हेच खूप मोलाचं आहे असं मला वाटतं. आतापर्यंत सुदैवानं माझा कुठलाच पदार्थ बिघडलेला नाही. माझ्या पदार्थांमधला पुरणपोळ्या, गुळाच्या पोळ्या हे पदार्थ सगळ्यांना आवडतात. माझ्या दृष्टीनं आयडियल किचन म्हणाल, तर माझ्या ताईचं आहे. "मावशीचं घर म्हणजे हॉटेलच आहे ना, पाहिजे तो पदार्थ मिळतो,' असं माझा मुलगा म्हणतो. ती पाहिजे ते पदार्थ करून देते आणि स्वच्छता, टापटीपही तितकीच असते. माहेरकडून मिळालेली शिस्त, नीटनेटकेपणा आणि सासरची आपुलकी, अगत्य अशा चांगल्या गोष्टींचा सुवर्णमध्य साधल्यानं माझं आयुष्य खूप छान, सुंदर बनलं आहे आणि स्वयंपाकामध्येही त्याचं प्रतिबिंब उमटतं आहे.
मंजूषा दातार-गोडसे

सौजन्य : ई-सकाळ

फीचर्स:मिस्टेक इज मिस्टेक

काही दिवसांपूर्वी आम्ही दोघे अमेरिकेस गेलो होतो. आमचा मुलगा कॅलिफोर्नियामध्ये राहतो. तेथील एक गमतीशीर किस्सा.आमच्या नातीचा वाढदिवस होता म्हणून एका केकच्या शॉपीमध्ये गेलो चॉकलेट केक मध्यम आकाराचा द्या, असे सांगितले. त्यांनी मला केक दाखवून लेगच पॅक केला. त्या केकवर त्यांनी बारा डॉलरच्या किमतीची छोटी स्लीप चिकटवली होती. ते पाहून मी बारा डॉलर त्यांना दिले केक ताब्यात घेतला. नंतर सहजच तेथील टेबलावरील पडलेला त्यांचा कॅटलॉग पाहिला. त्यातील केकची चित्रे पाहिल्यावर माझ्या असे लक्षात आले, की आम्हास पॅक करून दिलेल्या केकची किंमत बारा डॉलर नसून, ती अकरा डॉलर आहे. मी तातडीने केक विक्रेत्यास ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्यानेही कॅटलॉग पाहिला; तसेच कॉम्प्युटरमध्ये केकची किती डॉलरना नोंद आहे, तेही पाहिले. ते पाहिल्यानंतर आपण चुकून एक डॉलर जादा घेतल्याचे त्याच्या ध्यानात आले. त्याने लगेच, "सॉरी' असे म्हणून माझ्या हातावर पूर्ण बारा डॉलर ठेवले. मी अवाक झालो. मी म्हणालो, "मला फक्त एक डॉलरच परत द्या', त्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून मी चाटच पडलो. त्याच्या मते असे चुकून जादा पैसे घेतले गेल्यास संपूर्ण रक्कम परत देण्याची प्रथा आहे ती वस्तू पूर्णतः फुकट भेट म्हणून ते देतात. मी म्हणालो, "आपण असे का करता? माझी काहीच तक्रार नाही, मला फक्त एक डॉलर दिला तरी चालेल.' त्यावर त्याने दिलेले उत्तर त्याच्याच भाषेत नमूद करतो.""Sorry Sir! The mistake is mistake. I should be punished for that. Americans are honest. I work for my nation also.''असा अनुभव मला माझ्या देशात येईल काय? Soujanya : E-sakal (Pailatir)

फीचर्स:फुललेल्या कुशीचं गाणं

माझ्या लग्नाला या वर्षी २१ वर्षं पूर्ण झाली. या एकवीस वर्षांचे खूप सुख-दुःखाचे अनुभव आहेत. ते सर्व लिहिता येणार नाहीत. पण सर्वांत मोठा अनुभव आहे तो वांझोटेपणात काढलेला.
एखादी स्त्री वांझ असणे हा तिचाच दोष असतो, असा लोकांनी समजच करून घेतलेला आहे. तो दोष मस्तकी घेऊन पंधरा वर्षे काढली. दवा, पाणी, डॉक्‍टर, बाबा, मंत्र, तंत्र, गंडे, दोरे हे सर्व करत असतानाच पंधरा वर्षांनी गोड बातमी कळली, की मी आई होणार आहे! आणि माझ्या आनंदाला उधाण आलं. पण ही बातमी दोन महिने वयाचीच होती.
सोनोग्राफीत त्या बाळाची नैसर्गिक वाढ खुंटली आहे, असं सांगितलं आणि डॉक्‍टरांनी या सांगितलेल्या शब्दांमुळे माझ्या पायाखालची जमीनच हादरली. माझ्या या आनंदात सहभागी होणारे सर्वच हादरले. मला कसे सांभाळून घ्यावे, हे त्यांना कळेच ना. पण जे होणार होते ते ते थांबवू शकत नव्हते. शेवटी एकदाचा गर्भपात करावा लागला. त्यानंतर मात्र मुलाचा विषय सोडून दिला. (पण मनात होतंच.) त्यानंतर पुन्हा तीन वर्षांनी तोच दिवस उजाडला. त्या दिवशी कळलं, की मी पुन्हा आई होणार आहे.
पुन्हा तपासण्या, औषधी गोळ्या, सोनोग्राफी यांचे सत्र सुरू झाले. आधी घडलेल्या त्या घटनेमुळे मी जरा दडपणाखालीच वावरत होते. पण ते काही वावगं ठरलं नाही. चार महिनेनंतरच्या सोनोग्राफीत कळलं, की बाळाच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या हृदयाला रक्तपुरवठा करण्यात कमजोर ठरत होत्या. म्हणजेच हृदयाचा वॉल खराब आहे आणि एक मोठे छिद्र आहे असे कळले. आता काय निर्णय घ्यावा हा प्रश्‍न होताच. आई होण्याची जिद्द मनात होती. शेवटी घरच्यांचे, बाहेरच्यांचे, डॉक्‍टरांचे चांगले वाईट सल्ले ऐकून आई व्हायचे ठरवले. पण ते फार जोखमीचे, जिद्दीचे काम आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यासाठी रोज बाळाचे ठोके मोजणे, बाळ पोटात किती वेळा फिरतं ते बघणे, औषध, पाणी हे डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली सुरू झाले. मनातले दडपण वाढतच होते. त्यात सीझर ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्‍टरांनी सांगितले.
बाळ नॉर्मल स्थितीत नसल्याने डिलिव्हरी नॉर्मल होणार नाही असे डॉक्‍टरांनी आधीच सांगितले होते. आणि एकदाचा तो दिवस उजाडला, एक जून, २००५.
एक छोटी परी माझ्या आयुष्यात आली. "तनिष्का.' ती झाली त्याचा आनंद एकही दिवस उपभोगू दिला नाही. दुसऱ्या दिवशी डॉक्‍टरांनी तिच्या हृदयाचं ऑपरेशन त्वरित करावं लागेल असं सांगितलं आणि मनावर पुन्हा आघात झाला. बाळ होण्याच्या शुभेच्छा घेत तो वेळ आनंदात काढावा असं तेव्हा वाटतसुद्धा नव्हतं. मनात प्रश्‍नांचं काहूर माजलं होतं.
तनिष्काला घेऊन मी आणि तिचे वडील पुण्यातील नामांकित डॉक्‍टरांकडे गेलो. पण तनिष्काचं ऑपरेशन यशस्वीपणे पार पडेल याची गॅरंटी कोणीच देत नव्हते. नाही तर तनिष्काची आशा सोडावी लागेल, असे डॉक्‍टरांनी सांगितले. बाळाबरोबर माझीही तब्येत बिघडत होती. तरी आपण धीर सोडायचा नाही असा मी निर्धार मनाशी केला होता. प्रत्येक जण मला आपण यावर काय करू शकतो हे समजावत होतं. पुण्यातील डॉक्‍टरांकडून निराश होऊन मी मुंबई गाठली.
मुंबईतील दोन-तीन नामांकित डॉक्‍टरांकडूनही निराशा पत्करावी लागली. मुंबईतील नामांकित हार्ट इन्स्टिट्यूटनेही मला नाराज केलं. मुंबईत मी तनिष्काला डॉक्‍टरांबरोबर देवालाही घेऊन गेले. हे सर्व पेलण्याचे मला बळ मिळू दे, हे मागणं मागत होते. ते मागणं देवाने पूर्णही केलं. मी मुंबईतील माटुंगा येथील डॉक्‍टर भरत दळवी यांच्याकडे तनिष्काला घेऊन गेले. त्यांनी मला तनिष्काची ९९ टक्के गॅरंटी दिली. मनात एक आशेचा किरण दिसू लागला. हा सर्व डॉक्‍टरांचा खेळ करण्यात तनिष्का दहा महिन्यांची झाली. या दहा महिन्यांत तनिष्काची तब्येत खालावत चालली होती.
प्रत्येक वेळी रडताना ती काळी-निळी होऊन बेशुद्ध पडायची. या दहा महिन्यांत तिने दूध कमी आणि औषधंच जास्त घेतली होती किंवा असं म्हणा ना ती औषधावरच जगली. जन्म झाल्या झाल्या ज्या मुलीचे ऑपरेशन सांगितले त्या मुलीने दहा महिने काढणं हा माझ्यासाठी चमत्कारच होता. माझ्यासाठी ती आज दिसते आहे, उद्या दिसेल की नाही याची शाश्‍वती नव्हती. तिला मी जेथे जेथे घेऊन फिरले तेथे तेथे प्रत्येक पावलाबरोबर माझ्या पाठीशी उभी राहिली ती माझी मोठी वहिनी सुनीता. कारण माझीही तब्येत त्याच काळात बिघडत चालली होती. ती मला आणि बाळाला दोघांनाही सांभाळत होती.
डॉ. दळवी ऑपरेशन नानावटी हॉस्पिटलमध्ये करतात, असे समजले. आणि तनिष्काचं ऑपरेशन दहा मे, २००६ रोजी नानावटीमध्ये यशस्वीरीत्या पार पाडले. आणि माझ्या हिरमुसलेल्या कळीला बहर आला. गर्भवती राहिल्यापासूनचे ते तनिष्काचे ऑपरेशन हे दिवस अग्निपरीक्षेचे होते. पण याच काळात माझ्या पाठीशी उभा राहिलेला माझा परिवार. माझी मोठी ताई पुष्पा, माझी लहान बहीण अविता, माझे दोन्ही भाऊ-वहिनी, माझी आई आणि लहान भाच्या विनिता, आरती, पूजा, पूनम, प्रियांका, दर्शनी आणि माझा भाचा आकाश यांनी मला जो मानसिक आधार दिला तो शब्दांत लिहिता येणार नाही. आज तनिष्का चार वर्षांची आहे। हा काळ मला बरेच शिकवून गेला. आपल्या कमजोर काळात आपण धीर खचू द्यायचा नाही. आपल्या माणसांत फक्त माझ्या माहेरचे नसून माझे सर्व नातलग आणि मित्र परिवार यांचा फार मोठा वाटा आहे. आणि त्याची मला जाणीव आहे
सौज्यन्य : ई-सकाळ



फीचर्स:"बिफोर टाइम''

"बिफोर टाइम"
हा अनुभव आहे १७ एप्रिलचा. काही कामानिमित्त मी आणि माझे सहकारी पुण्याहून अमरावतीला निघणार होतो. बसचे तिकीट दोन दिवस आधीच काढले होते. जंगली महाराज रोडवरून सहा वाजता बस निघणार होती. दिलेल्या रिपोर्टिंग टाइमप्रमाणे ५.४५ ला आम्ही स्टॅंडवर पोचलो. चौकशी केल्यावर तिकडच्या माणसांनी आम्हाला झापण्याच्या स्वरात विचारलं; "किती वाजले? वेळेवर यायला नको आणि मग बस चुकली की कटकट करतात. बस आत्ताच गेली ! आता बस धरायची असेल तर ताबडतोब येरवड्याचा स्टॉप गाठा.''आमच्या पायाखालची जमीनच सरकली. काहीही चूक नसताना त्याची बोलणी खाऊन आम्ही निघालो. "वेळेआधी बस सोडलीच कशी? आणि तिकीट काढून प्रवासी आले नसतील तर फोन करून विचारायला काय झालं?' असे असंख्य प्रश्‍न मनात उभे राहिले; पण बस गाठणे जास्त महत्त्वाचे होते म्हणून आम्ही ताबडतोब रिक्षा करून येरवड्याकडे प्रयाण केले. प्रचंड गर्दी होती. घड्याळाचे काटे सरकत होते तशी आमची परत बस चुकायची भीती वाढत होती. तेवढ्यात मी बस कंपनीच्या ऑफिसमध्ये फोन करून बस आमच्यासाठी थांबवण्याची विनंती केली. "बस जास्तीत जास्त दहा मिनिटं थांबेल; लवकर पोचा', असं म्हणून त्यांनी फोन आपटला.गर्दी, ट्रॅफिक जॅम, सिग्नल पार करत करत एकदाचे आम्ही बसपाशी पोचलो. सामान डिकीत ठेवता ठेवता त्याला अशी कशी बस वेळेआधी सोडली? म्हणून विचारणा केली असता, "ऑफिसमध्ये चौकशी करा, आम्हाला सांगितलं, की आम्ही निघतो,' अशी तोडकी-मोडकी उत्तरं मिळाली. बसमध्ये शिरल्यावर असे लक्षात आले, की अर्धी बस रिकामीच होती. आमच्यासारखे अजून बरेच जण तिकडे पोचायचे होते. सर्व प्रवासी येईपर्यंत बराच वेळ गेला आणि साडेआठला आमची बस एकदाची निघाली. नंतर असे कळले, की प्रचारासाठी कोणीतरी नेते त्या दिवशी पुण्यात येणार होते म्हणून रस्ते बंद केले होते. कितीही योग्य कारण असलं तरी प्रवाशांना फोन करून बस लवकर निघाल्याची माहिती देणं हे बस कंपनीचं काम नाही का? का पैसे घेतल्यावर सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या? मनात विचार आला, हे नेते निवडून येण्याआधीच असा लोकांना त्रास देत असतील तर निवडून आल्यावर काय करतील??

सौजन्य: ई -सकाळ

मुक्तसवांद :4 पुण्याचा पाहुणचार

तसा मी कोल्हापूरचा! एका लहान खेड्यात राहायचो. माझ्या आयुष्यातील सुरवातीची १६ वर्षे मी गावातच काढली. दहावीत चांगले गुण मिळवून मी पुण्यात उच्च शिक्षणासाठी आलो. गावी पुण्यात बरेच मजेशीर भिन्न अनुभव आले.

गावी पाहुण्यांचा गोतावळा बराच मोठा होता. आठवड्याला एखाद-दुसरा तरी पाहुणा घरी यायचा. पाहुणा आला म्हणजे पाहुणचार आलाच. पाहुणचाराची सुरवात मात्र पाणचट व्हायची- पाणी देऊन!

पाणी देऊन झाले, की चहा किंवा सरबत केले जायचे. पाहुणा जरी नको म्हणाला, तरी "चहा बनवला आहे,'' असे सांगून त्याला गप्प करायचे. "बिचारा नको असतानाही चहा प्यायचा.'' चहा फक्त कपातूनच द्यायचा म्हणजे गरम चहा लवकर संपणार नाही आणि तो गार होईपर्यंत आपल्या गप्पा मात्र मारून घेऊ.

आई, बाबा पाहुण्यांबरोबर गप्पा मारत असताना मी गप्प बसायचो. सर्वांचीच गप्पांची मैफील चांगलीच जमायची. मधूनच पाहुणे मला प्रश् विचारायचे.

पाहुणा जर चहा पिऊन जास्त वेळ बसला, की आई जेवणाची विचारपूस करायची. जो लाजाळू पाहुणा असायचा तो भूक लागलेली असूनही नको म्हणायचा. त्यातूनच एखादा जेवायला हवे, असे म्हणाला, की आईची धांदल उडायची.

असो!
शेवटी काय, तर पाहुणचार मात्र जोरदार व्हायचा, पाहुणा खूष होऊन जायचा.
अलीकडे मी पुण्यासारख्या शहरात राहायला आलो आहे. या ठिकाणी गावापासून दूर असल्याने पाहुण्यांचा गोतावळा तसा फारच कमी; मात्र पाहुण्यांपेक्षा मित्र व ओळखीच्या लोकांची फौजच्या फौजच असते. ओळखी किंवा मित्रता आली म्हणजे जवळीकता आली, घरी येणे-जाणे आले.
पुण्यात मात्र मी काहीशी वेगळी पद्धत अनुभवली- पाहुणचाराची! इथेही गावांप्रमाणेच पाहुणा आल्यानंतर पाण्याची विचारपूस होते. इथे पाहुणा म्हणजे ओळखीचा माणूस किंवा मित्र. चहाची पद्धत मात्र थोडी वेगळीच आहे. पाणी देऊन झाल्यानंतर, "चहा देऊ का,' असा प्रश्‍न विचारला जातो. पाहुणा लाजेने नकोच म्हणतो. बिचारा चहा हवा असतानाही तसाच राहतो. मात्र, एखादा खोडकर पाहुणा विचारल्या विचारल्याच होकार देतो. मग मात्र आईची किंवा घरातल्या गृहिणीची धांदल उडते. तिला आपल्या कामाची चिंता लागलेली असते. त्यातूनच पाहुण्याने चहाची मागणी केल्यानंतर पटकन चहा बनवून दिला जातो. पाहुणा आनंदाने चहा पिऊन खूष होतो; मात्र लाजरा पाहुणा पाण्यावरच निघून जातो.
तरी देखील पुण्यासारख्या वेगवान जीवनपद्धती असलेल्या शहरात पाहुणचारासाठी एवढा वेळ काढला यास मला दाद द्यावीच लागेल. हल्ली रक्ताचे नाते ओळखत नसलेल्या समाजामध्ये मित्रत्वाचे नाते इतके अतुटनेने जपलेले मी पाहिले आणि फारच आश्‍चर्य वाटले.
मी पुण्यात आलो, पुणेकर झालो, याबद्दल मला आजही अभिमान वाटत आहे

सौजान्य:--सकाळ

Features

फीचर्स :मन करुया प्रसन्न

फीचर्स:मिस्टेक इज मिस्टेक

फीचर्स:फुललेल्या कुशीचं गानं

फीचर्स:"बिफोर टाइम''

फीचर्स:आयुष्यावर बोलू काही

फीचर्स:स्वतःच स्वतःला चार्ज करू या

फीचर्स 1:मन करुया प्रसन्न

चांगली शैक्षणिक पार्श्‍वभूमी असूनही पत्नीने नोकरी करणे नवऱ्याला आवडत नाही व स्वतःलाही नोकरी करण्याचा तसा कंटाळा म्हणून गृहिणी असणारी, पण नेहमी चिडचिड करणारी व सदा रडवेल्या चेहऱ्याने वावरणारी स्मिता, त्या दिवशी महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेल्या उपक्रमातील एका कार्यक्रमात भेटली आणि तिचा हसरा चेहरा, आत्मविश्‍वासपूर्वक वावर तिच्यावरील चिंतेचे, ताणाचे मळभ नाहीसे झालेले आहे किंबहुना तिला स्वतःलाच "ती' आता सापडली आहे, असे सूचित करीत होते. त्याच वेळी कायमच नोकरी व घर यापलीकडे काही करायचे तर वेळ मिळत नाही, म्हणून स्वतःवरच चिडणारी अनुजासुद्धा त्या कार्यक्रमासाठी खास वेळ काढून आलेली पाहून खरंच खूप छान वाटलं.

सध्याची स्त्री, मग ती नोकरी करणारी असो किंवा न करणारी आणि ती कोणत्याही वयोगटातील असो, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी व ताणतणाव तिच्यासमोर असतात आणि त्या ताणतणावाशी लढण्याचे मार्ग आपल्या प्रत्येकापुढे वेगवेगळे असतात. त्यातले काही विधायक, सकारात्मक, तर काही नकारात्मकही असतात. खरं तर आपण ताणाशी सामना कसा करतो, याचा थेट संबंध आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याशी असतो. ज्याचा परिणाम अर्थातच कौटुंबिक आणि पर्यायाने सामाजिक स्वास्थ्यावरही होत असतो.
मुळात ताण म्हणजे काय, तर आपली सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता व सभोवतालच्या परिस्थितीच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा यातील अंतर वाढत जाते आणि त्या वेळी असमायोजनाची परिस्थिती उद्‌भवते. साहजिकच या निर्माण होणाऱ्या असमायोजनाचा आपल्या शरीर व मनावर प्रतिकूल परिणाम होतो.

नोकरी किंवा व्यवसाय करत अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांना रोजचा स्वयंपाक, मुलांची तयारी, दगदगीचा प्रवास करून ऑफिस गाठावं लागतं, अन्‌ पुन्हा ऑफिसात दिवसभर काम करून घर गाठावं लागतं. रोजचा उगवलेला दिवस कामाच्या व्यापात कसा संपतो, हे कळतही नाही. अपुरी झोप, रोजच्या प्रवासाची दगदग, कामाचा रगाडा, कुटुंबातील प्रत्येकाच्या वेळेच्या मागण्या, या सगळ्याचा परिणाम आपल्याला काय दिसतो, तर चिडचिड, तब्येतीची हेळसांड, स्वतःच्या आवडीनिवडीची काटछाट.
नोकरी न करता घरची आघाडी सांभाळणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत, तर त्या घरातच असतात म्हणून त्यांना बहुतेक वेळा गृहीतच धरलं जातं . त्यामुळे निराशा, चिंता, संशयीपणा, चिडचिडेपणा त्यांच्यातही असतो. शारीरिक आरोग्याबाबत आपण जेवढे जागरूक झालेले आहोत, तेवढेच मानसिक आरोग्याच्या बाबतीत बेफिकीर! मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे, हे अजूनही पचनी पडत नाही.

नातेसंबंधातील मोठ्या ताणतणावांचा सामना पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त करतात; याची दोन प्रमुख कारणे आपल्याला दिसतात. एक म्हणजे बहुतेकींना "सुपर वूमन सिंड्रोम''ने पछाडलेले दिसतं. त्यामुळे "मी घरही उत्तम सांभाळते आणि नोकरीही उत्तम रीतीने करते,' यांसारख्या अविवेकी विचारांनी पछाडलेले असल्याने वेळप्रसंगी चिडचिड होते व मनःस्वास्थ्य बिघडलेले राहते. कारण सर्व आघाड्यांवर सारख्याच प्रभावाने लढणे, सामोरे जाणे सर्व वेळ शक्‍य होत नाही.
दुसरे कारण म्हणजे बहुतेक जणींची आपल्या घरसंसारात प्रचंड गुंतवणूक असते. त्यामुळे जरी घरकामासाठी बाई असली, तरी आपण बसविलेल्या घडीनुसार घरातील स्वच्छता, स्वयंपाक इ. गोष्टी झाल्या नाहीत तर खूप चिडचिड होते. त्यातूनच वेळी-अवेळी झोपणे, सतत टी.व्ही. पाहणे, जाता-येता सतत काहीतरी तोंडात टाकणे (खाणे), मनातल्या मनात कुढत राहणे, अशा चुकीच्या मार्गांचा वापर केला जातो. त्यामुळे मनाचा असंतुलितपणा शारीरिक स्वास्थ्यावर प्रतकूल परिणाम करतो व मासिक पाळीतील अनियमितता, वजन वाढणे, हळवेपणा वाढणे, औदासिन्य इ. सारखी लक्षणे पाठ सोडत नाहीत. आता हे जर आपल्याला टाळायचे असेल तर-

आपण स्वतःला व स्वतःच्या भावनांना ओळखून त्या योग्य रीतीने व्यक्त करण्यास शिकले पाहिजे. बऱ्याचदा आपण मनाविरुद्ध निर्णय घेतो व मनातल्या मनात सतत कुढत राहतो. अशा वेळी आपल्या कुटुंबीयांशी त्या निर्णयासंदर्भात मनमोकळेपणाने मुद्देसूद चर्चा करण्यास आपण शिकले पाहिजे.

बऱ्याचदा इतरांशी नकळत तुलना करून आपण आपल्या चिंतेचा भार वाढवीत असतो आणि नकळत दुःखद, त्रासदायक आठवणी सतत जपून ठेवत असतो (विशेषतः सासू, नणंद आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तींच्या कृती व त्यांची शेरेबाजी). पण, जर आपण आपला व आपल्या कुटुंबीयांचा चांगल्या, वाईट गोष्टींसह स्वीकार करण्याचा प्रयत्न केला, तर आपला चिंताभार आपसूक कमी होईल.

आजच्या चौकोनी व त्रिकोणी कुटुंबाची वाटचाल "स्व'केंद्री होत चाललेली आहे. त्यामुळे कुटुंबातील संवाद व ताणतणावांचा वेळेतच होणारा निचरा हा फायदा आता मिळेनासा होत आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक आपल्या कुटुंबातील नातेसंबंध सुधारण्यासाठी व सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
खरे तर आपले विश्‍व जेवढे संकुचित, तेवढे आपले प्रश्‍न आपल्याला मोठे वाटतात. याउलट आपले विश्‍व जेवढे व्यापक, तेवढे आपले प्रश्‍न कितपत महत्त्वाचे, हे आपल्याला आपसूक जाणवतं. यामुळे कुटुंब व आपण रिफ्रेश होण्यासाठी आई, पत्नी, मुलगी, सून या भूमिकांमधून बाहेर पडून स्वतःचा एक व्यक्ती म्हणून थोडा विचार केला आणि आसपासच्या सामाजिक उपक्रमांत निखळ आनंद मिळविण्यासाठी आपण सहभागी झालो, तर तणावमुक्तीवरील लेख वाचायची वेळ आपल्यावर यायची नाही, पटतयं ना!

प्रसन्नता राखण्यासाठी...
* स्वतःवर प्रेम करायला शिका.
* स्वतःसाठी थोडा वेळ काढा.
* स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या.
* मैत्रीची नाती जोपासा.
* सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा।

सौजान्य :-सकाळ

मुक्तसंवाद

मुक्तासंवाद:1 अभिमान
मुक्तासंवाद:२ एक नात
मुक्तसंवाद:३प्रतिज्ञा
मुक्तसवांद :4 पुण्याचा पाहुणचार
मुक्तसंवाद: ५ माझं किचन- मंजूषा दातार-गोडसे
मुक्तसंवाद : माझं किचन - डॉ. निशिगंधा वाड
मुक्तसंवाद:७ माझं किचन - प्रिया बेर्डे




मुक्तसंवाद 3 :प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे
सारे भारतीय माझे बांधव आहेत
अशी प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातून वर्षानुवर्षे वाचायला मिळते. ही प्रतिज्ञा आहे राष्ट्रप्रेमाबद्दलची. विद्यार्थ्यांना या देशातील परंपरांचा सार्थ अभिमान वाटावा याबद्दलची.

गेली तेहतीस वर्षे मुला-मुलींमध्ये वाचनप्रियता रुजावी, वाढावी यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी बालसाहित्य जत्रेपासून विविध उपक्रम संपन्न करतो आहे. सतत त्याचाच ध्यास. एक दिवस अचानक

वाचन हा देखील माझा श्‍वास आहे.

ग्रंथसंग्रह माझा ध्यास आहे.

या दोन ओळी स्फुरल्या. मग शब्दांशी खेळत साहित्य परंपरेचा अभिमान मनात रुजावा, वैश्‍विक भाषाभगिनीशी स्नेह वाढावा, वाचन, लेखन, मायबोलीचा विद्यार्थ्यांनीच नव्हे तर समस्त वाचकवर्गाने जयजयकार करावा अशी नवी प्रतिज्ञा लिहिली.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेमार्फत प्रथम अडीच हजार बुकमार्क छापले. ही ग्रंथखूण डॉ. पु. स. पाळंदे यांच्या स्मृत्यर्थ प्रसिद्ध केली. प्रायोजक होते डॉ. सतीश देसाई. ग्रंथप्रकाशन समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रसंगी हे बुकमार्क भेट म्हणून देऊ लागलो. लोकांना ही कल्पना आवडली. अजित आपटे यांना यापासून प्रेरणा मिळाली. त्यांनी ग्रंथखुणेवर लोकमान्य टिळकांचे प्रकाशचित्र छापावे अशी अपेक्षा व्यक्त करत केवळ ग्रंथखूणच नव्हे तर "अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र' भित्तिपत्राच्या आकाराची ही प्रतिज्ञा प्रायोजित केली.
शाळाशाळांतून त्याचा प्रसार होऊ लागला आणि मग त्याची चांगल्या अर्थाने लागणच झाली. विषय समजताच त्याचं महत्त्व ओळखून प्रायोजक भेटू लागले. स्वामी विवेकानंद, सावरकर, आंबेडकर, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे यापैकी ज्याला जी व्यक्ती अधिक पूजनीय वाटायची त्याचे प्रकाशचित्र छापण्याचा आग्रह झाला. त्यानुसार बुकमार्क प्रसिद्ध होऊ लागले. विद्यार्थ्यांना कोणत्या नेत्याचे चित्र अधिक ओळखीचे हे कळून येऊ लागले.

दूरदर्शनच्या विळख्यातून दूर होऊन सर्वांनी ग्रंथ वाचावेत यासाठी गतवर्षी बालवाचकांसाठी असलेल्या छात्र प्रबोधन, कुमार, चैत्रेय, इ. विविध नेहमीच्या अथवा दिवाळी अंकातून ही नवी प्रतिज्ञा प्रसद्ध केली. अनेक जण या प्रतिज्ञेच्या प्रेमात पडले. त्या संपादकांनी अथवा व्यक्तींनी वेगवेगळ्या आकारात ही प्रतज्ञा छापून भेटीदाखल देण्याचा सपाटा सुरू केला. चांगल्या विधायक कार्यास समाजाचा पाठिंबा, प्रतसाद असतो हे त्यावरून अनुभवास आले.

ही नवी प्रतिज्ञा वाचकांच्या डोळ्यांसमोर राहावी, यासाठी ती प्रकाशकांनी पुस्तकात छापावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पाठ्यपुस्तकातील प्रतज्ञेप्रमाणे ही प्रतज्ञा स्वतंत्र पानावर छापणे खर्चाचे वाटल्यास पुस्तकाच्या पान २ वर (जिथं प्रकाशक, मुद्रक मजकूर असतो) तिथे छापा, असा आग्रह मी धरत आहे. त्याला प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा. कोणी माझं नाव न छापता प्रसिद्ध करण्याची मागणी केली. भारतीय संस्कृतीचे अनेक ग्रंथ अपौरुषेय आहेत. मग छोट्या प्रतिज्ञेचे काय? मी त्यांची मागणी आनंदाने मान्य केली आहे. प्रचार महत्त्वाचा ही त्यामागची माझी भूमिका.
अमेरिकेच्या साहित्य संमेलनात पाठवण्यासाठी शिरीष चिंधडे यांचेकडून ती इंग्रजी भाषेत करून घेतली. ही प्रतिज्ञा आर्ट पेपरवर रंगात छापावी असे वाटले. यासाठीचे प्रायोजकत्व दाजीकाका गाडगीळ यांनी स्वीकारले. प्रसंगी अखंडित वाचित जावे हा समर्थ रामदासांचा सोन्यासारखा विचार गाडगीळ अँड कं.च्या जाहिरातीसह छापला. डॉ. विजया वाड संपादित ८-१० पुस्तकांत ही प्रतिज्ञा छापली गेली.

ग्रंथ आपुला सखा, गुरू, बंधू हे तत्त्व मला मान्य आहे. विश्‍वातील सर्व मोठी माणसे "मोठे' होण्यात ग्रंथवाचनाचा सिंहाचा वाटा असल्याबद्दलच्या अनेकांच्या कथा मी कथाकथनातून सांगतो. संसारसागर तरुन जाण्यासाठी, नम्रतेने स्वीकारावे ही माणूसपणाची शिकवण देणारी ही प्रतिज्ञा गेल्या सव्वा वर्षात किमान लाख लोकांनी अंदाज. तुम्ही देखील या प्रतिज्ञेचे निष्ठावान प्रतिष्ठित व्हावे ही अपेक्षा. जय लेखन, जय वाचन, जय मायबोली.
- दत्ता टोळ, सदाशिव पेठ
नवी प्रतिज्ञा
वाचन हादेखील आमचा श्वास आहे.
ग्रंथसंग्रह आमचा ध्यास आहे
सारे उत्तम ग्रंथ, आमचे गुरू अन्
आमचे मित्र आहेत, मातृभाषेवर
आमचे प्रेम आहे, मराठी भाषेच्या
समृद्ध अन् विविधतेने नटलेल्या
साहित्य परंपरांचा आम्हाला
सार्थ अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक अन् वाचक होण्याची
पात्रता अंगी येण्यासाठी
आम्ही सदैव आस्वादक वाचक होऊ.
मायबोलीचा, गुरुजनांचा
वडीलधारे अन् साहित्यिकांचा
आम्ही सदैव मान ठेवू.
सर्व भाषा भगिनींशी स्नेह राखण्याची
आम्ही प्रतिज्ञा करत आहोत.
वाचन, लेखन, वैश्विक भाषासमृद्दी
यातच मनुष्यमात्राचं आम्ही सौख्य मानतो.
जय लेखन जय वाचन

सौजान्य :ई-सकाळ

मुक्तासंवाद 2 : एक नात

बारा वर्षांनी का होईना, पण रक्ताची नाती एकत्र येतात, असं म्हटलं जातं. पैसा नातं जुळवितोही आणि तोडतोही. कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी पैसाच दडलेला असतो.

काही आर्थिक कारणावरून आम्हा दोघा भावांमध्ये वितुष्ट आलं. रक्ताचं नातं विसरलं गेलं. दोन दिशांना दोघांची तोंडं झाली. आम्ही दोघांनी वेगवेगळा संसार केव्हाच थाटला होता. गंजपेठेतील वडिलोपार्जित भाड्याचं घर त्याच्या ताब्यात देऊन मी कोथरूडला घर बांधलं होतं.

एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं, ते पैशापायी दुरावलं गेलं. जेथे माझं बालपण गेलं, ज्या घरात सुरवातीला माझा संसार फुलला, त्या गंजपेठच्या घराचा रस्ताच मी विसरून गेलो.

वर्षामागून वर्षं लोटत गेली. माझ्या दोन्ही मुलांची मी लग्नं केली; पण भावाला बोलावलं नाही. तोही आला नाही. भावाची दोन नंबरची मुलगी माझी खूप लाडकी होती. तिचं "अबोली'' हे नाव मीच ठेवलं होतं. पण तिच्या लग्नाला भावानं बोलावलं नाही. मीही गेलो नाही.

नातेवाइकांच्या लग्न समारंभामध्ये भाऊ-भावजय दिसायची; पण आम्ही दोघंही एकमेकांचे तोंड पाहत नव्हतो; मग बोलणं तर दूरच. भावाची मोठी मुलगी राणी फलटणची नगरसेविका बनली. एकमेकांबद्दलच्या इत्थंभूत बातम्या हस्ते-परहस्ते दोघांनाही कळत होत्या. मनातून आनंद वाटत होता. पण ओठ गच्च शिवलेले होते.

कालचक्र फिरतच होतं. बोल बोल म्हणता एक दशक सरलं. तब्बल दहा वर्षं आम्ही एकमेकांकडे ढुंकून पाहिलं नाही. अध्येमध्ये स्वप्नात भाऊ यायचा. विरोधाची धारही कमी होऊ लागली होती. मनातून खूप वाटायचं- झालं गेलं विसरून भावाला भेटायला जाऊ या. बायकोही मनधरणी करायची- "तुम्ही एकाच रक्ताचे सख्खे भाऊ; मग किती दिवस एकमेकांपासून दूर राहणार. आपल्यातरी जवळचं कोण आहे? तुम्हीच जर असा आडमुठेपणा धरून ठेवला तर आपल्या मुलांमध्ये तरी आपल्यामागे एकमेकांबद्दलची आपुलकी, प्रेम राहील का?' पटत होतं, पण वळत नव्हतं.

माझ्या थोरल्या बहिणीला - ताईला वाटायचं, मी मरण्याअगोदर तरी हे दोन भाऊ एकत्र आलेले मला पाहायला मिळतील का? तिची ही तळमळ काही नातेवाइकांमार्फत माझ्यापर्यंत पोचत होती. काळजात चर्रर होत होतं, पण मन तयार होत नव्हतं. स्वतःचा अहंकार फणा काढून सदैव डंख मारत होता.

तो धाकटा आहे, त्यानं एक पाऊल पुढे टाकायला काय हरकत आहे? त्याच्या मुलींचे एवढे लाड केले, पण त्या एखाद्या समारंभात भेटल्या तर माझ्याकडे धावत का येत नाहीत? आम्हा भावा-भावांचं भांडण झालं असेल, त्यांनी का अबोला धरावा? माझ्याशी बोलायला त्यांना कोण अडवणार आहे? प्रश् आणि प्रश्नच. मनात पडलेला प्रश्नांचा गुंता सुटत नव्हता, तर तो अहंकाराला फुंकर घालत होता.

भावाच्या धाकट्या मुलीचं- दीपाचं लग्न ठरलं. माझ्या तिन्ही मुलांनी एकमतानं ठरवलं, काकाच्या शेवटच्या मुलीचं लग्न; या लग्नाला जायचं. थोरल्या मुलानं माहेरी गेलेल्या बायकोला बोलावून घेतलं. मुलांना आईची साथ मिळाली. सगळे जण माझी विनवणी करू लागले. काही झालं तरी दीपाच्या लग्नाला जायचंय.

पण लग्नात आपला कोणी अपमान केला तर...? त्याची चूक होती म्हणून तो झक्कत माझ्या पाया पडायला आला, असं भाऊ सगळ्यांना सांगू लागला तर...?

"मन चिंती ते वैरी चिंती' असं म्हटलं जातं. मनात अनेक शंका-कुशंकाचे काळे ढग झाकोळून आले. माझा अहंपणा माझ्या मनात अनेक खड्डे-खळगे निर्माण करीत होता. पण बायकोसह मुलांनी चंगच बांधला होता. कोणत्याही परिस्थितीत माझ्यासह लग्नाला जायचंच. मी मोठा भाऊ या नात्यानं मन मोठं करून पुढाकार घ्यायचा. बायको-मुलांपुढे माझं काही चाललं नाही. सकाळी १२.३० चा मुहूर्त होता. भवानी पेठेतील "लक्ष्मी बाजार मंगल कार्यालया' लग्न होतं.

आम्ही सर्व जण सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमारास कार्यालयात पोचलो. खाली दरवाज्यातच भाऊ उभा होता. आम्हाला पाहताच त्याच्या डोळ्यांत चटकन पाणी आलं. माझ्याही डोळ्यांत अश्रू जमा होऊ लागले होते. वर हॉलमध्ये आम्ही जाताच नातेवाइकांमध्ये एकच गलका झाला. जो तो माझं नाव घेऊन "आला... आला...' असं म्हणू लागला.

राणीनं मला पाहताच माझ्या गळ्याला कडकडून मिठी मारली. "पप्पा, तुम्ही आम्हाला का विसरून गेलात...' तिच्या या वाक्याने आत्तापर्यंत आवरून धरलेला अश्रूंचा बांध फुटला गेला. दोघेही हुंदके देत रडू लागलो. जवळच भाऊसुद्धा रडत उभा होता. ताई त्याला घेऊन माझ्याजवळ आली. मला मिठी मारत तो म्हणाला, "मी असा काय गुन्हा केला, की तू मला वाळीत टाकलंस.''

सगळे नातेवाईक आमच्याजवळ गोळा झाले. माझ्या मावसभावाचे जावई म्हणाले, "मामा, आज भरतभेट पाहिली. डोळ्यांचं पारणं फिटलं. तुम्ही आल्यामुळे लग्नाला खऱ्या अर्थाने शोभा आली.''

अनेक जण मला म्हणाले, "तू मोठा आहेस. तू मन मोठं करून सगळ्या कुटुंबाला घेऊन लग्नाला आलास. खूप चांगलं केलंस. तू जास्त शिकलासवरलेला आहेस. आपल्या दुबळ्या भावाच्या मागे उभा राहा. त्याला वाऱ्यावर सोडू नकोस.''

सगळे संभ्रम दूर झाले. जेथे भाऊ नीट बोलेल की नाही याची धास्ती वाटत होती, तिथं उलटंच घडलं. लग्नाची सगळी सूत्रं भावानं माझ्या मुलांच्या हवाली केली.

लग्नाचा सोहळा पाहताना मनात आलं, की आपला अहंकार आपल्याला सुखाच्या कित्येक क्षणांपासून वंचित करतो। ते सुखद क्षण आपण आपल्या हातातून निसटून जाऊ देतो. पैसा येतो आणि जातोही; पण जीवनात येणारे सुखाचे क्षण पुन्हा नाही जीवनात येत. आपल्या अहंकारामुळे आपल्या लाडक्या पुतणीचं- नव्हे मुलीचं लग्न आपल्याला नाही पाहता आलं आणि आपल्या पुतणीला मिळालेला नगरसेविकेचा मान... तो तरी कोठे पाहता आला. हे सुखाचे क्षण केवळ आपल्या अहंपणामुळेच आपल्या हातून गेले ना! मग आपल्या शिक्षणाचा, व्यासंगी वाचनाचा काय उपयोग? आणि आपल्या पोकळ पांडित्याचा तरी काय उपयोग?

सौजन्य:-सकाळ

मुक्तसंवाद १:अभिमान

माझे आजोबा जवळ जवळ १२० वर्षांपूर्वी रहिमतपूर (जि. सातारा) हून नागपूर म्हणजे तेव्हाच्या सी. पी. एन्ड बेदार प्रांतात नोकरीकरिता गेले आणि मग तेथेच स्थायिक झाले.

माझ्या वडिलांचा जन्म, शिक्षण, नोकरी असे पूर्ण आयुष्य मध्य प्रांतात निरनिराळ्या गावी गेले. माझा जन्म, शिक्षण, नोकरी आणि त्यानंतर वयाच्या ६० व्या वर्षांपर्यंत मी मध्य प्रांतातच होतो. सर्वांत जास्त ४६ वर्षे ग्वाल्हेरला होतो.
माझी पत्नी महाराष्ट्रातील नाशिकची होती. माझ्या वडिलांना मराठी भाषेबद्दल खूप अभिमान होता. ते नेहमीच मराठी पुस्तक वाचायचे आणि थोडंफार लेखनपण करायचे. माझी पत्नी मराठी भाषेची पदवीधर आणि शिक्षिका होती. आम्ही घरात मराठीतच बोलत होतो.

घरात नेहमीच मराठी पुस्तकं, मासिकं असायची. मुलांना चांगलं मराठी बोलता येते. एवढंच काय, माझी नात (मुलीची मुलगी) जिचा जन्म अमेरिकेत झाला, तीपण मराठी चांगली बोलते. मलाही शुद्ध मराठी बोलता येतं. चार वर्षांपूवी मी मध्य प्रांत नेहमीकरिता सोडून पुण्यात स्थायिक झालो.

एवढी प्रस्तावना लिहिण्याचं कारण, आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहूनही मराठी संस्कृती आणि भाषा जपून ठेवली. महाराष्ट्राबाहेर सर्व प्रांतांत मुख्यत्वेकरून दिल्ली, मध्य प्रांत, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये मराठी माणूस जवळजवळ ३५० वर्षांपासून (म्हणजे छत्रपती शिवाजी महारांच्या काळापासून) स्थायिक झाले आहेत. मराठी संस्कृती आणि भाषेबरोबर त्यांनी त्या त्या ठिकाणची संस्कृती, भाषा आणि चालीरीती आत्मसात केल्या आहेत आणि तेथील जनतेशी सलोखा करून गुण्यागोविंदाने राहत आहोत.

प्रत्येक गावात जेथे ५०-६० मराठी कुटुंब आहेत तेथे महाराष्ट्र समाज आहे. गणपती-गौरी, चैत्र हळदी-कुंकू, मराठी नाटक व्याख्यान, यात्रा इत्यादी कार्यक्रम अधूनमधून होतात. तेथील सामान्य जनता अशा कार्यक्रमात हिरिरीने भाग घेते. भारताच्या बाहेर, जेथे मराठी माणसं आहेत तेथे पण असे कार्यक्रम होत असतात. न्यू जर्सी अमेरिकेच्या डॉ. नेरूरकर चांगल्या मराठी नाटकांचे दिग्दर्शन करतात. नुकतेच अमेरिकेत तेथील मराठी माणसांनी जागतिक मराठी साहित्य संमेलन थाटामाटाने साजरे केले. पण या गोष्टीचे कौतुक करण्याऐवजी महाराष्ट्रातल्या काही लोकांनी त्याबद्दल आक्षेप घेताना मराठी माणसांना तेथील नागरिकांकडून कधीच त्रास होत नाही.

कोणत्याही बाबतीत भेदभाव नसतो. बरीच मराठी मंडळी इतर प्रांतात राजकारणात आणि सत्तेमध्येपण आहेत. मोठमोठ्या हुद्द्यावर काम करतात.

काही वर्षांपूर्वी मुंबईत व कन्नड, तमीळ आणि मल्याळी लोकांविरुद्ध चळवळ झाली तसेच काही दिवसांपूर्वी उत्तर भारतीय - बिहारी लोकांच्याविरुद्ध मोठी चळवळ झाली. बरीचशी मंडळी घाबरून महाराष्ट्र सोडून गावी परत गेली. त्यातील ९०-९५ टक्के माणसे लहान लहान कामात म्हणजे मजूर, सुतार, गवंडी, भाजीवाले, दूधवाले होते. त्यामुळे सर्वसाधारण माणसाची आणि मुख्यत्वे करून बांधकाम व्यवसायाला धक्का बसला. तसं पाहिलं तर महाराष्ट्रात राजस्थानी, गुजराती, पंजाबी, सिंधी, पारशी खूप आहेत.

९०-९५ टक्के व्यापार-धंदा, कारखाने त्यांच्याच मालकीचे आहेत. (मराठी माणूस फक्त डॉक्‍टर, वकील किंवा इंजिनिअर वगैरे कामात आहे.) मग त्यांच्याविरुद्ध चळवळ का झाली नाही? कारण ते सर्व श्रीमंत आणि मोठे व्यापारी आहेत. (बिर्ला, टाटा, अंबानी, गोदरेज, हिरानंदानी रहेजा वगैरे) आणि त्यांच्यामुळे येथील लोकांना नोकऱ्या मिळतात. त्यांच्याविरुद्ध कोणाचीच बोलण्याची हिंमत नाही. कारण ते सर्व पक्षांना पैसा देत असावेत आणि त्यांच्याविरुद्ध चळवळ उभारली तर लोकांची कामे जातील आणि जनता त्यांच्याविरुद्ध उठेल.

महाराष्ट्राशी केंद्र सरकारने नेहमीच दुजाभाव राखला. (थेट पंडित नेहरूंपासून) सर्व देशात भाषावार प्रांत करण्यात आले पण महाराष्ट्राला गुजरातशी जोडण्यात आले. कारण त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची होती. नंतर फार मोठी चळवळ झाली. १०० लोकांनी हौतात्म्य पत्करला आणि त्यानंतर सहा वर्षांनी मुंबईसह महाराष्ट्र करण्यात आला आणि त्यातही बेळगाव, हुबळी, धारवाडला वगळण्यात आले. सर्वांनाच याची कारणं माहीत आहेत. योग्य कारणासाठी चळवळी झाल्या तर महाराष्ट्रातील सर्व जनता साथ देईल.
रेल्वे मंत्रालय १० वर्षांपासून बिहारकडे आहे. त्यामुळे त्या प्रांताला रेल्वेतील नोकऱ्या, गाड्या आणि प्रोजेक्‍टसमध्ये प्राधान्य दिले जात आहे. याचे उदाहरण नुकतेच टाइम्समध्ये प्रकाशित रेल्वे पोलिस भरतीवरून मिळाले. या गोष्टीवर जर इतर प्रांताशी समन्वय साधून केंद्रावर दडपण आणले तर त्याचा जास्त उपयोग होईल. कायदा आपल्या हातात घेतला तर महाराष्ट्राचे नुकसान होईल आणि इतर प्रांतात विरोधी चळवळ उभी राहील. ते राष्ट्राच्या ऐक्‍याला करता योग्य होणार नाही.
देशातल्याच दुसऱ्या नागरिकांविरुद्ध चळवळी केल्या तर एकोपा कसा राहील? भारताच्या घटनेप्रमाणे नागरिकांना कोठेही राहण्याचा, काम, धंदा करण्याचा अधिकार दिला आहे आणि तो बळजबरीने कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. तसेच याचा परिणाम इतर प्रांतात राहणाऱ्या मराठी भाषिक लोकांवर होण्याची शक्‍यता आहे. नुकतेच हरियानाच्या कर्नाला शहरात एक मराठी कुटुंबाला हरियाना सोडून जाण्याबद्दल धमक्‍या दिल्या गेल्या पण तेथील शासनाने त्वरित पावले उचलल्यामुळे ती चळवळ पसरली नाही. महाराष्ट्र शासनानेपण जर योग्य पावले उचलली असती तर चळवळ लगेच आटोक्‍यात आणता आली असती. याचा प्रतिसाद उत्तर प्रदेश, बिहारमध्ये झालाच. लोकसभेत ही चर्चा झाली.
बिहार, उत्तर प्रदेशच्या राजनेत्यांनी महाराष्ट्र शासनानेच वाभाडे काढले. कहर म्हणजे बिहारच्या जनता दलाच्या लोकसभेच्या सदस्यांनी राजीनामा दिला. या प्रांतातले मंत्री केंद्र शासनात चांगल्या विभागात आहेत. (रेल्वे, खाणी, केमिकल्स, रूरल डेव्हलपमेंट वगैरे) त्यामुळे विभाजनाचे नवीन प्रोजक्‍ट्‌स महाराष्ट्रात येणार नाहीत. छत्रपती शिवाजींनी नेहमी संपूर्ण राष्ट्राचा विचार केला. फक्त महाराष्ट्राचा नाही. या गोष्टीची आठवण महाराष्ट्रातील राजनेत्यांनी ठेवली पाहिजे.

महाराष्ट्रात चांगले विचारवंत, दार्शनिक, वैज्ञानिक, राजनीतीज्ञ आहेत. त्यांनी राष्ट्राचे नेतृत्व करावे. फक्त महाराष्ट्रात आपले वर्चस्व न ठेवता सर्व प्रांतात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करावा. त्याकरिता संकुचित वृत्तीचा त्याग करावा. सध्या मध्य प्रांत, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, ओरिसा वगैरे मागासलेले आहेत. कारण त्यांना योग्य नेतृत्व मिळालं नाही. आता परिस्थिती झपाट्याने बदलत आहे.
हि. प्र. उत्तराखंडमध्ये जलविद्युत उत्पादन झपाट्याने वाढत आहे. म. प्र. छत्तीसगडमध्ये प्राकृतिक संपदा खूप आहेत. तेथेही नवीन उद्योग वाढत आहेत. उ.प्र., बिहार कृषिप्रधान प्रांत आहेत. काही वर्षांत तेथेही खूप प्रगती होणार आहे. मुंबईमुळे महाराष्ट्राला खूप फायदा मिळाला पण आता इतर शहरे बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद खूप वाढत आहेत. त्यामुळे तेथे नोकऱ्यांना खूप वाव आहे. खूप मराठी मंडळी तेथे काम करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नोकऱ्या हळूहळू कमी होतील आणि येथील शिकलेल्या तरुणांना परप्रांतीय किंवा परदेशी जावे लागेल.
सध्या मराठी माणसं धंद्यामध्ये खूपच कमी आहेत. त्यांना व्यापार धंद्यात आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे तरच मराठी माणसाला पुढे काही भवितव्य आहे.

आपण हे विसरता कामा नये की ३५० वर्षांपूर्वी मराठी लोकांनी दिल्लीपर्यंत मजल मारली. अटकेपार भगवा फडकविला. गुजरात, मध्य प्रांतात राज्यस्थापना केली. जवळजवळ पूर्ण राष्ट्रावर मराठी सत्ता गाजली. आजही तेथील जनता (उदा. ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा संस्थान) या राजघराण्यांना मान देते. कारण त्यांनी तेथील लोकांशी समन्वय साधला, चांगली कामे केली. म्हणूनच शिंदे घराण्याच्या वारसांना आजही येथील जनता निवडून लोकसभेत पाठविते.
स्वातंत्र्य युद्धामुळे मराठी माणसाने जिद्दीने भाग घेतला आणि हौतात्म्य पत्करला. असं सर्व असूनही महाराष्ट्राला राष्ट्राच्या क्षितिजावर स्थान नाही. त्याचे कारण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची संकुचित वृत्ती असावी. म्हणून त्यांनी इतर लोकांचा द्वेष न करता त्यांना आपल्यात सामावून घेतले पाहिजे. तसेच इतर प्रांतातील लोकांनी महाराष्ट्रात आल्यावर आपली भाषा, संस्कृती जपून येथील भाषा, संस्कृती आत्मसात करावी आणि येथील लोकांशी समन्वय साधून राहावे म्हणजे असल्या चळवळींना वाव मिळणार नाही. त्यांनी इतर प्रांतातल्या राजनेत्यांना स्पष्ट सांगावे की त्यांनी त्यांच्या वादात नाक खुपसू नये. ते स्वतः समन्वयाने मार्ग काढतील.

अतिरेक्‍यांनी पाकिस्तानच्या मदतीने बऱ्याचदा मुंबईवर हल्ले केले. सर्वांत मोठा हल्ला २६-११ चा होता. जर भारताचे गुप्तहेर खाते सजग असते तर एवढा मोठा हल्ला होणे शक्‍यच नव्हते. १५-२० माणसे आधुनिक शस्त्र घेऊन समुद्रमार्गे कराचीहून मुंबईत शिरतात, एवढा मोठा हल्ला करतात आणि त्याचा थांगपत्ता आपल्याला लागत नाही, म्हणजे ही नामुष्कीच म्हणावी लागेल. अतिरेक्‍यांना थोडीफार मदत नक्कीच काही स्थानिक देशद्रोह्यांनी केली असेल यात काहीच शंका नाही. तसेच मुंबईकर थोडे जरी जागरूक असते तर समुद्रातून किनाऱ्यावर उतरताना किंवा रस्त्यावर मोठे हेवरसेक पाठीवर घेऊन जाताना थोडी तरी शंका यायला हवी होती आणि ताबडतोब पोलिसांना सूचना देण्याची गरज होती. तरी मुंबईकरांनीही जागरूकता दाखवायची अत्यंत गरज आहे.
सामाजिक संघटनांनी, समाजकार्यकर्त्यांनी, वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी, मजूर संघटनांनी, द्वारसिंग ग्रुप्स आणि सर्व धर्मीयांनी समन्वय साधून पोलिसांच्या मदतीने एक साखळी निर्माण करून कोण्या कोपऱ्यातील होणाऱ्या प्रतिनिधीची माहिती पोलिसांना दिली तर अतिरेकी हल्ले टाळता येऊ शकतील. सध्या संपूर्ण राष्ट्रात एक ते दीड कोटी बांगलादेशी घुसखोर आणि पाकिस्तानातून घातपात करण्याच्या हेतूने घुसलेले बरेच लोक आहेत. त्यांना हुडकण्यात पोलिसांना सर्व संघटनांनी मदत केली पाहिजे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात असा प्रयत्न झाला होता, पण बंगालच्या डाव्या पक्षाच्या राजवटीने तो हाणून पाडला. त्याची कारणं सर्वांना माहीतच आहेत. त्याकरिता महाराष्ट्र शासनाने सर्व प्रांतांचे सहकार्य मागून केंद्र सरकारवर दडपण आणले पाहिजे.

सध्या आपल्या देशाच्या चारी बाजूला खूपच गडबड चालू आहे. पाकिस्तानात अनागोंदी कारभार, बांगला देशात बांगला देश रायफल्सने केलेला विद्रोह... अशा सर्व परिस्थितीत राष्ट्रात एकी असणं फार गरजेचे आहे. ही गोष्ट सर्व राजकीय पक्षांनी लक्षात घेऊन कार्य करायची गरज आहे. म्हणजेच राष्ट्राचे सार्वभौमत्व टिकवता येईल.
सौजान्य:-सकाळ