तसे पाहिले तर माझे लग्न होईपर्यंत माहेरी माझ्या वाटेला स्वयंपाकघरातील कोणतेही कामच येत नसे. कुटुंबात स्वयंपाकघरात काम करणाऱ्या अनेक व्यक्ती होत्या. त्यात मी घरात शेंडेफळ असल्यामुळे लाडाकोडात वाढलेली; पण काम अंगावर पडल्यावर शिकावेच लागते. तोच अनुभव माझाही.
लग्नानंतर वेगळा संसार थाटल्यावर प्रत्येकीला स्वयंपाकात स्वयंसिद्ध व्हावे लागते, त्याच प्रक्रियेतून मी गेले. मला तशी स्वयंपाक करायची आवड नव्हती; पण गरजेपोटी सर्वकाही करावे लागते. अर्थात गरजेपोटी करायचे असले, तरी ते केवळ करायचे म्हणून करायचे नाही, हे माझे तत्त्व. तीच शिस्त माझ्या स्वयंपाकात आणि स्वयंपाकघरात आहे. कुटुंबीयांना चारी ठाव चांगले करून देणे, अन्न मोजकेच असले तरी ते पौष्टिक असावे, त्यातील सकसता कशी वाढवता येईल याला प्राधान्य द्यावे, अशाच मताची मी आहे. म्हणून स्वयंपाकघरातील स्वच्छता आणि अन्नाची सकसता यांना मी नेहमीच अधिक महत्त्व देत आले आहे.
पाककृती आणि पाककला या दोन भिन्न बाबी आहेत. पाककृती या प्रयत्नांनी जमू शकतात; पण पाककलेसाठी जी रसिकउडी घ्यावी लागते, ती प्रत्येकाला जमतेच असे नाही. पाककला हीदेखील इतर कलांसारखीच एक कला आहे. मी जेव्हा स्वयंपाक करायला शिकले, तेव्हा ते कुणा एकाकडूनच शिकले असे नाही, व्यक्ती, अनुभव, गरज, पुस्तके आणि नियतकालिके, दूरचित्रवाणी अशा विविध माध्यमांतून मी शिकत गेले. काही गोष्टी आजीच्या पाहून शिकले, तर लग्न झाल्यावर चिकनचे पदार्थ नवऱ्याकडूनही शिकले. स्वयंसिद्ध होणे महत्त्वाचे आहे. मग ती स्वयंसिद्धता आपल्या स्वयंपाकघरात का नसावी? मॉड्युलर किचन घेणे आता अनेकांना परवडण्यासारखे असते. मायक्रोवेव्ह अनेकांच्या घरात असतो. आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा पूर्णतः विसर पडला आहे, असे मलातरी वाटत नाही आणि जाणवत नाही. म्हणून ज्या अन्नावर आपले पालनपोषण होते, ते अन्न अधिकाधिक चांगल्या तऱ्हेने कसे सिद्ध करता येईल, यासाठी प्रत्येक गृहिणीने दक्ष राहिले पाहिजे. ही दक्षता मी घेत असते. म्हणून माझ्या घरी स्वयंपाक करण्यासाठी इतर व्यक्ती असल्या तरी माझ्या स्वयंपाकघरावर अधिराज्य माझेच असते. स्वयंपाकघरात काय हवे, किती हवे, कसे हवे, कधी हवे, याचा निर्णय मीच घेते.

स्वयंपाकघर हे माझ्यासाठी दुसरे देवघरच असते; नव्हे, माझे देवघरच स्वयंपाकघरात आहे. त्यामुळे तेथला नीटनेटकेपणा आणि स्वच्छता याला मी प्राधान्य देत आले आहे. देवाची भक्ती जशी मनाची मशागत करते, तशी शरीराची मशागत अन्नातून होत असते. हे अन्न थेट पोटात जात असते. त्यामुळे त्याच्या बाबतीत कटाक्ष हा असलाच पाहिजे. माझ्या मुलीला जंक फूडची मी कधीच सवय लावली नाही. आता तिलाच असे बाहेरचे खाद्यपदार्थ आवडत नाहीत. माझ्या सुदैवाने मला योग्य वेळी आहारासंबंधीची खूप चांगली चांगली पुस्तके वाचायला मिळाली. गर्भावस्थेपासून वयात येईपर्यंत कोणते अन्नघटक परिपूर्ण वाढीसाठी आवश्यक आहेत, याचे चांगले ज्ञान मला या पुस्तकांतून मिळाले. त्याचाही मी परिपूर्ण वापर माझ्या स्वयंपाकघरात करते.
जाता जाता मला एक सुचवावेसे वाटते- सध्या महिला कर्ती झालेली आहे. शिकलेली आहे. स्वतः काहीतरी वेगळे करावे, अशी युयुत्सु वृत्ती तिच्यात आहे. स्त्रीने प्रयत्नवादी असावेच; पण प्रयोगशीलही असावे. ही प्रयोगशीलता स्वयंपाकघरात दिसून यावी. स्वयंपाक हे केवळ मुलींचे वा स्त्रियांचेच क्षेत्र आहे, असे आता पूर्णत्वाने म्हणता येणार नाही. मुली अभ्यासात आणि करिअरमध्ये क्रांती करीत आहेत. म्हणून घरातील मुलांनाही स्वयंपाकघरातील मदतीचे शिक्षण द्यावे. त्यांनाही स्वयंसिद्ध करावे. यात कमीपणा नसून समंजसपणा आहे, हेही त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे.
माझी आवडती डिश - मिक्स व्हेजिटेबल पराठा
साहित्य - एक कप गव्हाचे पीठ, एक कप बेसन, पाव कप ज्वारीचे पीठ, पाव कप तांदळाचे पीठ, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, दोन चमचे तेल, एक उकडलेला बटाटा, एक गाजर किसलेले, अर्धी जुडी पालक (वाटून घेतलेली), लसणाच्या दोन पाकळ्या, एक चमचा ओवा, एक चमचा साखर, दोन चमचे लोणी, दोन चमचे लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ.
कृती - वरील सर्व पदार्थ पिठात नीट कालवून मळून घ्यावे आणि पराठे लाटून तव्यावर दोन्ही बाजूला कमीत कमी तेल लावून शक्यतो वाफेवर शेकावे.
या पराठ्यात बहुतेक सर्व पदार्थांचा समावेश आहे. त्यात पौष्टिक घटकही पुरेपूर आहेत. शिवाय, मुलांना शाळेत टिफीनमध्ये देता येण्यासारखेही आहे. गृहिणींना ही डिश जरूर करावी. स्वतः चाखावी व मुलांनाही याची गोडी लावावी.

डॉ. निशिगंधा वाड
सौजन्य : ई-सकाळ
सौजन्य : ई-सकाळ
No comments:
Post a Comment