Wednesday, July 1, 2009
फीचर्स:मिस्टेक इज मिस्टेक
काही दिवसांपूर्वी आम्ही दोघे अमेरिकेस गेलो होतो. आमचा मुलगा कॅलिफोर्नियामध्ये राहतो. तेथील एक गमतीशीर किस्सा.आमच्या नातीचा वाढदिवस होता म्हणून एका केकच्या शॉपीमध्ये गेलो व चॉकलेट केक मध्यम आकाराचा द्या, असे सांगितले. त्यांनी मला केक दाखवून लेगच पॅक केला. त्या केकवर त्यांनी बारा डॉलरच्या किमतीची छोटी स्लीप चिकटवली होती. ते पाहून मी बारा डॉलर त्यांना दिले व केक ताब्यात घेतला. नंतर सहजच तेथील टेबलावरील पडलेला त्यांचा कॅटलॉग पाहिला. त्यातील केकची चित्रे पाहिल्यावर माझ्या असे लक्षात आले, की आम्हास पॅक करून दिलेल्या केकची किंमत बारा डॉलर नसून, ती अकरा डॉलर आहे. मी तातडीने केक विक्रेत्यास ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्यानेही कॅटलॉग पाहिला; तसेच कॉम्प्युटरमध्ये केकची किती डॉलरना नोंद आहे, तेही पाहिले. ते पाहिल्यानंतर आपण चुकून एक डॉलर जादा घेतल्याचे त्याच्या ध्यानात आले. त्याने लगेच, "सॉरी' असे म्हणून माझ्या हातावर पूर्ण बारा डॉलर ठेवले. मी अवाक झालो. मी म्हणालो, "मला फक्त एक डॉलरच परत द्या', त्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून मी चाटच पडलो. त्याच्या मते असे चुकून जादा पैसे घेतले गेल्यास संपूर्ण रक्कम परत देण्याची प्रथा आहे व ती वस्तू पूर्णतः फुकट भेट म्हणून ते देतात. मी म्हणालो, "आपण असे का करता? माझी काहीच तक्रार नाही, मला फक्त एक डॉलर दिला तरी चालेल.' त्यावर त्याने दिलेले उत्तर त्याच्याच भाषेत नमूद करतो.""Sorry Sir! The mistake is mistake. I should be punished for that. Americans are honest. I work for my nation also.''असा अनुभव मला माझ्या देशात येईल काय? Soujanya : E-sakal (Pailatir)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment